Politics: शरद पवारांना रोखणार? भाजपाचा अमेठी पॅटर्न बारामतीत, काय आहे गेम प्लॅन?

अमेठीप्रमाणेच येत्या 2024 चया लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हा देशाचे केंद्र बिंदू ठरण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी या मतदरासंघाची जबाबदारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपण्यात आली आहे. त्यांच्याकडे बारामती मतदारसंघाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. येत्या 18 महिन्यांत सीतारमण यांचे बारामती मतदारसंघात अनेक दौरे होण्याची शक्यता आहे.

Politics: शरद पवारांना रोखणार? भाजपाचा अमेठी पॅटर्न बारामतीत, काय आहे गेम प्लॅन?
बारामतीत अमेठी पॅटर्न Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 3:15 PM

बारामती – उ. प्रदेशात अमेठी हा इंदिरा गांधी यांच्या काळापासून गांधी घराण्याचा हक्काचा मतदारसंघ. दोन लोकसभा निवडणुकांत सातत्याने प्रयत्न करुन भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी हा मतदारसंघ अखेरीस भाजपाच्या पदरात पाडून घेतला. आता हाच अमेठी पॅटर्न (Amethi Pattern) वापरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि कुटुंबीयांचा हक्काचा असलेला बारामती मतदारसंघ काबीज करण्याचा विडा भाजपाने (BJP)उचलला आहे. यापूर्वी 2014आणि 2019अशा दोन वेळा भाजपाने प्रयत्न करुनही बारामती भाजपाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता राज्यातील, स्थानिक नेतृत्वाऐवजी ही जबाबदारी भाजपाच्या एका बड्य़ा महिला नेत्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजपाने आत्तापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बांधणीसाठी काम सुरु केले आहे.

काय आहे भाजपाचा प्लॅन?

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीचा दौरा करुन, भाजपाची रणनीती काय असणार आहे, हे सांगितले आहे. राज्यात येत्या लोकसभा निवडणुकीत 45 जागा निवडण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवलेले आहे. संघटनात्मक ताकद वाढवावी, यासाठी राज्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशात ज्या मतदारसंघात भाजपा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होती, असे मतदारसंघ निश्चित करण्यात आले असून, त्या ठिकाणी भाजपा येत्या दोन वर्षांत जोर लावणार आहे. राज्याच्या पातळीवर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही भाजपाचे माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर अमेठीत ज्या प्रमाणे स्मृती इराणी यांनी लक्ष घातले होते, त्याप्रमाणे देशाच्या एका बड्या महिला नेत्यालाही बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बारामती मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे

अमेठीप्रमाणेच येत्या 2024 चया लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हा देशाचे केंद्र बिंदू ठरण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी या मतदरासंघाची जबाबदारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपण्यात आली आहे. त्यांच्याकडे बारामती मतदारसंघाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. येत्या 18 महिन्यांत सीतारमण यांचे बारामती मतदारसंघात अनेक दौरे होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

या महिन्यातही त्यांचा तीन दिवसांचा दौरा बारामतीत होणार आहे. यावेळी बारामतीकर परिवर्तन घडवून दाखवतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. देशात अनेक मतदारसंघ असे होते की जिथे 40-40 वर्षे तेच निवडमून येत होते. नरेंद्र मोदींच्या काळात असे गड उध्वस्त झाले आहेत. तसाच बारामतीचा गडही उध्वस्त होईल अशी आशा बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती

2014 साली रासपचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना लढत दिली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना 521562 तर जानकर यांना 451843 मते मिळाली होती. सुळे या 69719 मताधिक्याने निवडून आल्या होत्या. खडकवासला, दौंड पुरंदर या मतदारसंघात त्या पिछाडीवर होत्या. तर बारामती, इंदापूर, भोर या मतदारसंघात त्यांना चांगले मताधिक्य मिळाले होते.

2019 च्या निवडणुकीत सु्प्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपाने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. भाजपाने ही निवडणूक तेव्हाही प्रतिष्ठेची केली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बारामतीत तळ ठोकून होते. मात्र तरीही सुप्रिया सुळे बारामतीतून 1लाख 55 हजारांच्या मताधइक्याने निवडून आल्या होत्या. बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि दौंडमध्येही सुप्रिया सुळेंना चांगले मताधिक्य मिळाले होते.

यावेळी मात्र पवारांचा अश्वमेध रोखण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे. राम शिंदे, दौंडमध्ये राहुल कुल, खडकवासल्यात भीमराव तापकीर, इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुंरदरमध्ये शिंदे गटात आलेले विजय शिवतारे या नेत्यांच्या साथीने आणि केंद्रीय मेतृत्वाच्या मदतीने बारामती जिंकण्याचा विडाच भाजपाने उचललेला दिसतो आहे. या भागात असलेल्या सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ते भाजपा कसे मोडून काढणार हाही मुद्दा महत्त्वाचा असणार आहे.

शरद पवारांना मतदारसंघात रोखण्याचा प्रयत्न

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. यात नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल या चार नेत्यांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची मानण्यात येते आहे. अशा स्थितीत शरद पवार यांना केंद्रीय पातळीवर सक्रिय होण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या होमपिचवरच रोखण्याचीही भाजपाचा प्रयत्न असेल.

2019 साली विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळेही भाजपाच्या पक्षश्रेष्ठींशी त्यांचे संबंध दुरावल्याचे मानण्यात येते आहे. याही कारणामुळे भाजपा बारामतीत प्रतिष्ठा पणाला लावण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांना 2019 च्या निवडणुकीत अमेठी आणि केरळच्या वायनाड अशा दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची वेळ आली होती. त्यात त्यांचा अमेठीत पराभव झाला होता. आता यंदा बारामतीत काय होणार, याची चर्चा आत्तापासूनच सुरु झालेली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.