Umesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

या प्रकरणी विदेशी शक्तीचा हात असू शकतो. एनआयए याचा तपास करत आहे. विदेशी कनेक्शन आहे का, या दिशेने तपास सुरू असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

Umesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील हत्येप्रकरणी बाहेरील कनेक्शन आहे का, हे शोधलं जाईल, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 5:09 PM

मुंबई : अमरावतीमध्ये उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही घटना अतिशय गंभीर आहे. ज्या पद्धतीनं मारण्यात आलं ते भयानक आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मास्टरमाईंडलाही अटक करण्यात आली आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. बाहेरचं कुठं कनेक्शन आहे का, याचा तपास (Investigation) सुरू आहे. देशात तणाव निर्माण व्हावा. यासाठी विदेशी शक्ती प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात काही बाहेरील शक्तीचा हात आहे का, याचा तपास होईल. या प्रकरणी सर्व बाजू लवकरच समोर येतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

विदेशी कनेक्शनचा शोध घेतला जातोय

उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरावर जखमांचे घाव आहेत. शवविच्छेदन अहवालात पाच ते सात इंज खोल जखमा असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी विदेशी शक्तीचा हात असू शकतो. एनआयए याचा तपास करत आहे. विदेशी कनेक्शन आहे का, या दिशेने तपास सुरू असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. उदयपूरच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे. उदयपूरमध्ये कन्हैयालाल या टेलरचा खून करण्यात आला. अशीच घटना अमरावतीत घडली. उमेश कोल्हे यांनी सोशल माध्यमात नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट टाकली. यावरून हा खून झाल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी मास्टरमाईंड इमरान खानला अटक करण्यात आली आहे. शिवाय ज्या पाच मारेकऱ्यांनी हा खून केला, त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. परंतु, इमरान खानला रसद कुणी पुरविली. याचे धागेदोरे आता तपासले जातील.

भाजपने व्यक्त केला होता संशय

उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली, असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांनी केली होती. दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक व ATS अमरावती शहरात दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.