सोडून गेलेल्यांना परत घेणार का? पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले
महाविकासआघाडीची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत नेत्यांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला उत्तर दिलंय. त्यांनी मोदी आणि अमित शाहांवर देखील टीका केली. जे सोडून गेलेत त्यांना परत घेणार यावर त्यांनी काय उत्तर दिलं जाणून घ्या.
मुंबईत आज महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘मी २२ जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होते. २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये म्हटलं होतं की, भाजप मुक्त राम पाहिजे. अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे तिथे भाजपचा पराभव झालाय. भाजपमुक्त राम झाला आहे.’
उद्धव ठाकरे यांना जेव्हा विचारण्यात आलं की, जे लोकं सोडून गेलेत त्यांना पुन्हा घेणार का? यावर उद्धव ठाकरे यांनी अजिबात नाही असं उत्तर दिलं.
‘जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तेव्हा आमची बैठक झाली आहेत. विधानसभेत सर्वांना सोबत घेणार. इतर घटक पक्षांना सोबत घेणार. राज्यात विधानसभा होणार आहे. इतर राज्यातही विधानसभा आहे. त्यामुळे तिथेही आपल्याला ताकद लावायची आहे.’
नरेटिव्ह भाजपनेच सेट केलं – ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘एक जुनं गाणं आहे. पारिजात माझ्या दारी फुले का पडती शेजारी. माणिक वर्माचं गाणं आहे. तुम्हाला माहीत नसेल, शरद पवार यांना माहीत आहे. तरीही आम्ही पारिजातकाला पाणी घालायचं सोडणार नाही. काही महिन्यांपूर्वी अमित शाह म्हणाले होते, नीतीश कुमार यांच्यासाठी दरवाजे बंद है, चंद्राबाबूंसाठी बंद आहे.’
त्यांच्याच लोकांनी सांगितलं संविधान बदलणार आहे. त्यांनीच हा नरेटिव्ह सेट केला होता. अच्छे दिनाच्या नरेटिव्हचं काय झालं. १५ लाखाचं काय झालं. २०१४ पर्यंतच्या गोष्टी काढल्या तर नरेटिव्ह कुणी सेट केलं. असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
आमच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ नाही
‘आमच्यात कोणीही मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. आम्ही एकत्र चर्चा केली आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे. मागच्या विधानसभेचा आधार घेऊन जागा वाटप होईल. आमच्यात कोणताही किंतू परंतु नाही. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.