दहिसरमध्ये वाईन शॉप्स सुरु, दुकानाबाहेर पोलिसांचा फौजफाटा, पोलिसांकडून नियम पाळण्याचे आवाहन
मुंबईच्या दहिसर येथे अनेक दारुचे दुकानं उघडली आहेत. या दुकानांबाहेर तळीरामांनी प्रचंड गर्दी केली आहे (Wine shops open in Dahisar).

मुंबई : कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला (Wine shops open in Dahisar) सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानंतर वाईन शॉप्सबाहेर तळीरामांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे. मुंबईच्या दहिसर येथे अनेक दारुचे दुकानं उघडली आहेत. या दुकानांबाहेर तळीरामांनी प्रचंड गर्दी केली आहे. तळीरामांनी वाईन शॉप्सबाहेर दीड ते दोन किमीच्या रांगा लावल्या आहेत. तळीरामांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा वाईन शॉप्सबाहेर तैनात झाला आहे (Wine shops open in Dahisar).
दहिसरमध्ये एकीकडे दारु खरेदीसाठी तळीराम प्रचंड गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे पोलीस वाईन शॉप्सबाहेर रांगा लावून उभ्या असलेल्या तळीरामांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायचे आवाहन करत आहे. पोलीस संयमाने सर्व तळीरामांना शिस्तीत रांगेत उभं राहण्याचे आवाहन करत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोनाचा आकडा दररोज वाढत आहेत. मात्र, कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रचंड मेहनत घेत आहेत. दरम्यान, सरकारने आता मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे.
तळीरामाकडून मुंबई पोलिसांचे आभार
“दारुचे दुकानं सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. ते पुढच्या वेळीदेखील देशाचे पंतप्रधान बनावे. पोलीस प्रशासनालाही धन्यवाद देतो. मुंबई पोलीस खूप चांगलं काम करत आहेत. दारु मिळाल्यामुळे मी खूप खूश झालोय”, अशी प्रतिक्रिया दहिसर येथे रांगेत उभा असलेल्या एका तळीरामाने दिली.
नाशिकमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज
नाशिकच्या त्रम्बक नाका परिसरात वाईन शॉपबाहेर मद्य खरेदीसाठी तळीरामांनी प्रचंड गर्दी केली होती. तळीरामांची एक ते दीड किमीपर्यंत मोठी रांग लागली होती. मात्र, या रांगेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. याशिवाय तळीरामांच्या अतिउत्सामुळे पोलीस प्रशासनाने दारुविक्रीस बंदी घातली. वाईन शॉप्सबाहेर गर्दी वाढल्याने नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी वाईन शॉप बंदचे आदेश दिले.
नाशिक : वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अखेर पोलिसांकडून लाठीचार्ज pic.twitter.com/VXLD43GsvW
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2020
महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम
दरम्यान, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्रीवरील बंदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मद्य विक्री बंदच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पाच जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंदच राहील.
संबंधित बातम्या :
Maharashtra wine shops update | दारुसोबत स्पिरीट टाकून पिल्यानं एकाचा मृत्यू