न विचारताच महिलेला XXX ग्रुपमध्ये अॅड केलं, अॅडमिनला अटक
मुंबई : मुंबईमधून एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अॅडमिनला अटक करण्यामागचं कारण तुम्ही ऐकून थक्का व्हाल. ग्रुपच्या अॅडमिनला महिलेच्या परवानगीशिवाय तिला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्याने ही पोलिसांनी अटक केलं आहे. एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रृप ऍडमिनला अटक करण्याची ही भारतातील ही पहिलीच वेळ आहे. अटक केलेल्या ग्रुप ऍडमिनचं नाव मुश्ताक अली शेख (24) असं […]

मुंबई : मुंबईमधून एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अॅडमिनला अटक करण्यामागचं कारण तुम्ही ऐकून थक्का व्हाल. ग्रुपच्या अॅडमिनला महिलेच्या परवानगीशिवाय तिला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्याने ही पोलिसांनी अटक केलं आहे. एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रृप ऍडमिनला अटक करण्याची ही भारतातील ही पहिलीच वेळ आहे. अटक केलेल्या ग्रुप ऍडमिनचं नाव मुश्ताक अली शेख (24) असं आहे.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी मुश्ताक हा बंगालमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करतो. आता त्याला महिलेची बदनामी करण्याचा आरोपावरुन इंडियन पिनल कोड आणि IT कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केलं.
या प्रकरणानंतर पोलिसांनी सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला समज दिली आहे.
काय आहे प्रकरण :
सप्टेंबर महिन्यात महिलेला मुश्ताकने अश्लील व्हिडीओ शेअर करणाऱ्या ग्रुपमध्ये तिच्या परवानगीशिवाय अॅड केलं. त्या ग्रुपचं नाव ‘XXX’ असं होतं. सुरुवातीला त्या महिलेला कुणी चूकून अॅड केल्याचं वाटलं, मात्र, हे जाणून बूजून केलं हे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली होती.
तपास अधिकारी भारत भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल झाल्यानंतर मुश्ताकचा नंबर पश्चिम बंगालमधील असल्याने तपास यंत्रणा बंगालला रवाना होणार होती. मात्र, मुश्ताकचा मोबाईल मुंबईत ट्रेस झाल्याने धारावीतून त्याच्या मुसक्या आवळल्या.
अटक झाल्यानंतर मुश्ताक सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तर देत होता. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा मान्य केला. तरी पोलीस पुढील तपास करत आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, मुश्ताकला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच 10 लाख दंड ही भरावा लागू शकतो.