MNS Activists | मुंबादेवी मध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण, गणपतीचं बॅनर लावण्यावरून धक्काबुक्की
MNS Activists | मुंबादेवी मध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण करण्यात आली आहे. गणपतीचं बॅनर लावण्यावरून महिलेला धक्काबुक्की करण्यात आली. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

MNS Activists | मुंबादेवी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण (Beaten to lady) करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने गणपतीचं बॅनर लावताना वाद झाला. त्यानंतर महिलेला धक्काबुक्की करण्यात आली. पीडित महिला प्रकाश देवी (Prakash Devi) याच्या मेडीकल समोर मनसे कार्यकर्ते खांब उभं करून बॅनर (Banner) लावत होते. महिलेने याला विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. यावेळी महिलेला शिवीगाळ करण्यात आली. गणेशोत्सवाला या घटनेमुळे गालबोट लागले आहे. वृद्ध महिलेला धक्काबुक्की केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरही उलटसूलट प्रतिक्रिया उमटत आहे. लोकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. चुकी कोणाची यावरुनही आता वाद पेटला आहे. मनसे कार्यकर्त्याच्या दादागिरीवरही लोकांनी आक्षेप घेतला आहे. सामोचाराने विषय हाताळला असता तर वाद पेटला नसता, असे काहींचे म्हणणे आहे.
काय आहे वाद
प्रकाश देवी यांचे मुंबादेवी परिसरात मेडिकल आहे. त्यासमोर गणेशोत्सवाच्या बॅनरसाठी खांब रोवण्यात येत होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे आणि त्यांचे साथीदार बल्ली रोवत होते. त्यातील एक बल्ली प्रकाश देवी यांच्या मेडिकलसमोरही रोवण्यात येत होती. त्याला त्यांनी कडाडून विरोध केला. तसेच ही बल्ली, लाकडी खांब काढून घेण्याची मागणी केली. त्यावरुन वाद वाढला. यानंतर मनसे कार्यकर्त्याने वृद्ध महिलेच्या कानशिलात लगावली. तिला धक्काबुक्की केली. यामध्ये ती महिला दोनदा खाली पडली. व्हायर व्हिडिओत हा सर्व प्रकार कैद झाला आहे.




मुंबई में एमएनएस नेता की गुंडई… महिला को मारा थप्पड़… #rajthackeray #mumbaibjp #bjp @MumbaiPolice pic.twitter.com/so7IGnCQ8s
— अजीत तिवारी (@ajittiwari24) September 1, 2022
महिलेला लगावली चापट
यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात मनसेचे मुंबादेवी परिसरातील विभाग प्रमुख विनोद अरगिळे यांनी पीडित महिलेला चापट मारल्याचे दिसून येते. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. महिलेने चापट मारण्याचे कारण विचारले असता, अरगिळे यांनी महिलेला धक्का दिला. काही लोकांनी मध्यस्थी केली. पण दोघांमधील वाद पुन्हा वाढला. त्यावेळी महिलेला पुन्हा धक्का दिल्याने ती खाली पडली. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.
शिवीगाळ केल्याचा आरोप
पीडित महिलेने अरगिळे यांनी मारहाण केल्याचे सांगितले. तर त्यांच्या साथीदाराने शिवीगाळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप केला आहे. मेडिकल समोर खांब रोवण्यावरुन हा वाद झाला. त्यानंतर वादाचे पर्यावसन मारहाण आणि शिवीगाळ करण्यात झाले. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.