‘मी इथे दबलोय, मला वाचवा…’, नवऱ्याचे फोनवरचे शब्द सांगताना ‘ती’ ढसाढसा रडली

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर एक महिला घटनास्थळी आली. ती प्रचंड रडत होती. तिला तिच्या नवऱ्याने फोन करुन आपण पेट्रोल पंपावर घडलेल्या दुर्घटनेत खाली दबलो गेलोय याची माहिती दिली. तिच्या पतीने तिला वाचवण्यासाठी विनवणी केली. पण ती एकटी काहीच करु शकत नसल्याने पतीसाठी व्याकूळ झालेल्या महिलेने टाहो फोडला. ती प्रचंड आक्रोश करत होती.

'मी इथे दबलोय, मला वाचवा...', नवऱ्याचे फोनवरचे शब्द सांगताना 'ती' ढसाढसा रडली
नवऱ्याचे फोनवरचे शब्द सांगताना 'ती' ढसाढसा रडली
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 8:45 PM

घाटकोपरच्या छेडानगर परिसरात घडलेल्या दुर्घटनेनं संपूर्ण मुंबई सुन्न झाली आहे. मुंबईत आज अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला. पावसासोबत आलेल्या वादळावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याच्या वेगामुळे घाटकोपरच्या छेडा परिसरात एका मोठ्या पेट्रोल पंपावर बाजूला उभं असलेलं भलंमोठं होर्डिंग कोसळलं. या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. याशिवाय पाऊस पडत असल्याने काही नागरिकांनी पेट्रोल पंपाच्या छताखाली उभं राहण्याचा मार्ग अवलंबला होता. या नागरिकांना त्यांच्यासोबत काय दुर्घटना घडले याचा काहीच अंदाज नव्हता. अचानक वाऱ्यामुळे बाजूला उभं असलेलं होर्डिंग जोराने पेट्रोल पंपावर कोसळलं आणि पेट्रोल पंपावर उभे असलेले सर्वजण या दुर्घटनेत दबले गेले. जवळपास 100 पेक्षा जास्त नागरीक या दुर्घटनेत होर्डिंग खाली दबले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच 61 नागरीक जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच अजूनही जवळपास 50 नागरीक अडकल्याची माहिती समोर येत आहे.

घटना घडल्यानंतर एक महिला घटनास्थळी दाखल झाली. या महिलेने आपल्या पतीसाठी टाहो फोडला होता. ती प्रचंड आक्रोश करत होती. आपल्या पतीला कुणीतरी वाचवावं यासाठी जीवाच्या आकांताने ती विनवण्या करत होती. आपला पती होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे. त्याने आपल्याला फोन केला होता. त्याला वाचवा. त्याने स्वत: फोन करुन आपल्याला वाचवावं, अशा विनवण्या केल्या होत्या. त्याला कुणीतरी वाचवा, अशी ही महिला आक्रोश करत म्हणत होती. महिलेची अवस्था बघून आजूबाजूच्या नागरिकांच्यादेखील डोळ्यांच्या कडा पाणावल्या. महिलेचा पती ढिगाऱ्याखाली अडकलाय. तो कदाचित जीवन-मरणाशी संघर्ष करत आहे. आपल्या पतीला आपण वाचवू शकत नाही, या विचाराने ती खूप दु:खी झाली होती. ती आपल्या पतीला पाहण्यासाठी प्रचंड व्याकूळ झालेली होती. यावेळी इतर नागरिकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

महिला नेमकं काय म्हणत होती?

“मेरे पती हैं… ते पेट्रोल भरण्यासाठी आले होते. एक तासापूर्वी त्यांचं माझ्याशी फोनवर बोलणं झालं होतं. मला वाचवा, मी इथे दबलो गेलो आहे, असं ते म्हणाले होते. त्यांनी मला फोन केला होता. पण त्यानंतर त्यांचा फोनच लागला नाही”, असं महिलेने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं. आणखी एका दुसऱ्या महिलेनेदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “त्या लोकांनी फोन उचलला नाही. मुंब्र्याहून परत इथे पेट्रोल टाकण्यासाठी आले होते. मोबाईलचा नेटवर्क लागत नाही”, असं ती महिला म्हणाली.

या दुर्घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “हे सर्व होर्डिंग बेकायदेशीर होते. त्यामुळे मी मुंबई महापालिका आयुक्तांना स्वत:हून भेटलो होतो. पोलीस आयुक्तांशी बोललो होतो. महापालिकेने कालच या इगो मीडिया कंपनीला ताबोडतोब होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती”, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....