Property Dispute | गुपचूप व्यवहार तिच्या अंगाशी आला, काय आहे मुंबईतील 100 कोटीच्या प्रॉपर्टीच प्रकरण?
Property Dispute | दक्षिण मुंबईतील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रॉपर्टीच हे प्रकरण आहे. मुंबईत जागांचे दर प्रचंड आहेत. मुंबईत घर विकत घेणं सोप नाहीय. भल्या भल्यांना पैसा असूनही जमत नाही. जागा विकणाऱ्याला मात्र बक्कळ पैसा मिळतो. विकणारा मालामाल होतो.
मुंबई : मुंबईत स्वत:च मालकी हक्काच घर असावं, असं प्रत्येकाच स्वप्न असतं. पण प्रत्येकाचच हे स्वप्न साकार होत नाही. कारण मुंबईत जागांचे दर गगनाला भिडलेले आहेत. मुंबईत जागा विकत घेण सोप नाहीय. मुंबईत जागा विकणाऱ्याला मात्र बक्कळ पैसा मिळतो. विकणारा मालामाल होतो. मुंबईत प्रॉपर्टी विक्रीच्या अशाच एका प्रकरणात महिलेला अटक करण्यात आलीय. मुंबईत एका 58 वर्षीय महिलेने आपल्या भावांशी संगनमत करुन मध्यवर्ती भागात असलेली प्रॉपर्टी एका विकासकाला विकली. या प्रॉपर्टीची किंमत 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. हा व्यवहार करताना महिलेने तिच्या चुलत भावंडांना अंधारात ठेवलं. त्यांना काही कळू दिलं नाही. त्यांचा सुद्धा त्या मालमत्तेवर तितकाच अधिकार होता. मुंबई पोलिसांनी संबंधित महिलेला म्हैसोर हॉटेलमधून अटक केली.
या प्रकरणात तिच्या अन्य नातेवाईकांचा किती सहभाग आहे? त्याचा पोलीस तपास करतायत. मध्य मुंबईतील 2 एकरवर ही प्रॉपर्टी पसरलेली आहे. तीन इमारती या जागेवर उभ्या आहेत. म्हैसोर कर्नाटक येथे ही महिला राहते. अबिदा जाफर इस्माइल तिच नाव आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तिला अटक केलीय. मागच्या आठवड्यात तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. अबिदाचा चुलत भाऊ अय्याझ कपाडियाने तिच्याविरोधात तक्रार नोंदवलीय. अय्याझ कपाडियचे दिवंगत वडिल जाफर कपाडिया आणि त्यांचे भाऊ लतीफ कपाडिया यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे. भावंडांनी मिळून काय डिक्लरेशन केलं?
दक्षिण मुंबईत लोअर परळ डिलाइ रोड येथे या तीन इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवाशी लतीफ यांच्या कुटुंबाला भाडं देतात. लतीफ आणि त्याच्या कुटुंबाने तिन्ही इमारतींचे 100 टक्के मालकी हक्क आपल्याकडे असल्याच खोट डिक्लेरेशन करुन विकासकाबरोबर करार केल्याच अय्याझ यांना समजलं. त्यांनी Action घेत नोटीस बजावली. अमीना यांच्याकडे भावांची पॉवर ऑफ अटॉर्नी होती. विकासकासोबतच्या करारपत्रावर तिने स्वाक्षरी केली. नव्या इमारतीत दोन फ्लॅट आणि तिने 3.5 कोटी रुपये घेतले. डीलची नेमकी रक्कम कितीय? ते अजून स्पष्ट झालेलं नाहीय. एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त दिलय.