मुंबईतील राजकीय वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून BMC अधिकाऱ्याला मारहाण, घडामोडी कुठपर्यंत जाणार?
कोण अधिकारी आहे तो बोलवून घ्या. कोण आहे तो दाखवा. कुणाची हिंमत झाली बाळासाहेबांचा फोटो असताना... बाळासाहेबांच्या फोटोला हात कसा लावला. असा जाब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विचारला.
मुंबई : मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यामुळं आता या घडामोडी कुठपर्यंत जाणार असा प्रश्न निर्माण झालाय. शाखा पाडताना बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. शाखा काढताना फोटो काढून मागितल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. पण, फोटो न काढता हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवला तर प्रतिक्रिया तर येणारचं असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलंय. कायदा कुणी हातात घेतला तर कारवाई होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.
कोण अधिकारी आहे तो
कोण अधिकारी आहे तो बोलवून घ्या. कोण आहे तो दाखवा. कुणाची हिंमत झाली बाळासाहेबांचा फोटो असताना… बाळासाहेबांच्या फोटोला हात कसा लावला. असा जाब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विचारला. कोण अधिकारी आहे तो बोलावून घ्या. कोण आहे दाखवा. असं म्हणून कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. इतर कर्मचारी त्यांच्या मदतीला धावले. पण, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. शाखा पाडते वेळी उपस्थित अधिकाऱ्याला जाब विचारण्याचा ठाकरे गटाने प्रयत्न केला. पालिका अधिकारी समोर येताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
तिथं त्यांनी कायद्याची धमक दाखवावी
माहीममधील आमदाराने गोळ्या चालवल्या त्याला शिक्षा द्या. मग कायद्याची धमक दाखवा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय. उपमुख्यमंत्र्यांनी आधी माहीममध्ये यावं. ज्या गद्दार आमदारावर कारवाई करावी ज्याने पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला. तिथं त्यांनी कायद्याची धमक दाखवावी. नंतर इतरांना सांगावं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर कुणी हातोडा चालवला तर त्यांच्या चाहत्यांची प्रतिक्रिया येऊ शकेल, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं.
दोषींवर निश्चित कारवाई होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोषींवर निश्चित कारवाई होईल. कुणी कायदा हातात घेणार असेल तर त्याच्यावर कारवाई करूच, असं फडणवीस यांनी म्हंटलं. शंभर टक्के कारवाई होईल. निश्चित कारवाई होईल. अशाप्रकारे कुणीही कायदा हातात घेणार असेल तर कारवाई आम्ही करूचं.
परब यांनी सांगितले तो प्रसंग का घडला?
अनिल परब म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती होती. शिवसैनिक सांगत होते की, आम्हाला ते बाहेर काढू द्या. मग तुम्ही तोडा. पण, तिथल्या मगृर अधिकाऱ्यांनी मूर्ती काढू दिली नाही. बाळासाहेबांचा फोटोदेखील काढू दिला नाही. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जात आहेत. त्याचा उद्रेक सहाजीकच होणार. शिवसैनिक कधीही बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करू शकत नाही. चर्चा सुरू असताना त्याचा उद्रेक झाला. त्यामुळे तो प्रसंग घडल्याचंही परब यांनी सांगितलं.