Cylinder Blast | वरळीत सिलेंडर स्फोट, चार महिन्याच्या बाळासह चौघे होरपळले
मुंबईत वरळी येथे आज आगीची एक भयानक घटना घडली. वरळीतील बीबीडी चाळीत एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट (Cylinder blast) झाला. या स्फोटात एका चार महिन्याच्या बाळासह चारजण होरपळ्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ नायर रुग्णालयात (Nair Hospital) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
मुंबई : मुंबईत वरळी येथे आज आगीची एक भयानक घटना घडली. वरळीतील बीबीडी चाळीत एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट (Cylinder blast) झाला. या स्फोटात एका चार महिन्याच्या बाळासह चारजण होरपळ्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ नायर रुग्णालयात (Nair Hospital) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट
वरळीतील कामगार वसाहत येथील बीडीडी चाळ क्रमांक 3 मधील एका घरात आज सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. आगीची घटना कळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग लेव्हल 1 ची असल्याची माहिती आहे.
चारजण जखमी, दोघं गंभीर
या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका चार महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. आनंद पुरी (वय 27), मंगेश पुरी (4 महिने), विद्या पुरी (वय 25), विष्णू पुरी (वय 5) हे चौघे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, आनंद पुरी आणि चार महिन्यांचे बाळ यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तर विद्या पुरी आणि विष्णू पुरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.