मुंबई लोकलमध्ये युवतीचा अश्लिल डान्स, युजर्स संतापले, रेल्वेने म्हटले…
Mumbai Local | सोशल मीडियावल लाइक्स आणि व्यूज मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही पातळीपर्यंत जातात. सार्वजनिक ठिकाणी नको ते वर्तन करतात. आता मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक युवती मुंबई लोकलमध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहेत.
मुंबई, दि. 26 फेब्रुवारी 2024 | मुंबईच्या लोकलमधून लाखो चाकरमाने रोज प्रवास करत असतात. यामुळे लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हटले जाते. या लोकलमध्ये झालेल्या एका प्रकारानंतर इंटरनेटवर युजर्स संतापले आहेत. धावत्या लोकलमध्ये एका युवतीने भोजपुरी गाण्यावर अश्लिल डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या डान्समुळे अनेक सहप्रवाशांना असहज वाटू लागल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना काही प्रवाशी आपला चेहरा झाकून ठेवत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच इंटरनेटवर युजर्स संतप्त झाले. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून प्रतिक्रिया आली आहे.
काय आहे प्रकार
सोशल मीडियावल लाइक्स आणि व्यूज मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही पातळीपर्यंत जातात. सार्वजनिक ठिकाणी नको ते वर्तन करतात. आता मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात एक युवती मुंबई लोकलमध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहेत. युवती अचानक आपल्या जागेवरुन उठते आणि सेंसेशनल डान्स करु लागेत. युवतीच्या डान्समुळे शेजारी बसलेल्या प्रवाशांनाही लाज वाटू लागते. काही प्रवासी अस्वस्थ होऊन उठून दुसरीकडे निघून जाताना व्हिडिओत दिसत आहेत.
@CPMumbaiPolice @mybmc @MumbaiPolice @WesternRly look into this matter please, this women breking rules of railways.using camera and nudes dance this happens in Mumbai local train 🚆 out the girl behind the bars.
— Rutik Pallewad 🚩🚩 (@PallewadRutik) February 24, 2024
रेल्वेचे उत्तर, चौकशीचे दिले आदेश
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओनंतर रेल्वेकडून उत्तर आले आहे. रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वेने एक्स हँडलवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांनी मध्य रेल्वे सुरक्षा विभागाला चौकशीचे आदेश दिले तसेच योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर इंटरनेटवर युजर्सकडून प्रतिक्रिया आला आहे. अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Now I know why railways stocks are skyrocketing pic.twitter.com/HBaExbats4
— desi mojito 🇮🇳 (@desimojito) February 23, 2024
सोशल मीडियावर युजर्सने कठोर कारवाई मागणी केली आहे. रेल्वेचे नेहमीचे उत्तर पाहून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. काही युजर्सकडून उपहासात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने गंमतीदारपणे म्हटले आहे, रेल्वेने आता तिकिटावर मनोजरंगन फ्री देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.