क्या बात है! भीक मागणार्‍या वृद्ध महिलांना तरूणाने घडवली हवाई सफर

यश माने या तरुणाने आपल्या स्वत:च्या खर्चाने दोन्ही वृद्ध महिलांना आयुष्यामधील पहिली हवाई यात्रा घडवून आणली आहे.

क्या बात है! भीक मागणार्‍या वृद्ध महिलांना तरूणाने घडवली हवाई सफर
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 9:22 PM

जितेंद्र पाटील, वसई : हवाईमार्गाने प्रवास करण्याचे बर्‍याच जणांचे स्वप्न असते. हवाई सफर करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते.परंतु, काही जण इतरांच्या चेहर्‍यावरील हास्याला आपले स्वप्न समजतात. अशा अवलियांपैकी एक म्हणजे यश माने. यशने ज्यांनी ध्यानीमनी किंवा स्वप्नीपण असा प्रवास करण्याचा विचार केला नसेल, अशा दोन महिलांना हवाई प्रवास घडवला आहे. यश माने या तरुणाने आपल्या स्वत:च्या खर्चाने दोन्ही वृद्ध महिलांना आयुष्यामधील पहिली हवाई यात्रा घडवून आणली आहे.

माणिकपूर परिसरातील रस्त्यावर शोभाबाई पवार (वय 62), सरूबाई पवार (वय 74) नावाच्या दोन वृद्ध महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. एकेदिवशी यश माने तेथे समाजकार्य करत असताना या महिलांशी त्याची भेट झाली.

यशला आजी नसल्याने या वृद्ध महिलांना आजी समजून त्यांच्या इच्छा, स्वप्न पूर्ण करण्याचे त्याने ठरविले. या महिलांनी हवाई सफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे यश माने या तरुणाने त्यांना थेट हेलिकॉप्टर सफर घडवण्याचे ठरवले.

हे सुद्धा वाचा

यशने या दोन्ही वृद्ध महिलांना हेलिकॉप्टर सफर घडवली. दुपारच्या सुमारास यशने मुंबईच्या सांताक्रूझ येथून उड्डाण करत वरळी सिलिंक ते वसई, विरार आणि ठाणे अशी 40 मिनिटांची हवाई सफर त्या महिलांसोबत केली .

या अनपेक्षित हवाई सफरीने दोन्ही महिलांना प्रचंड आनंद झाला. रस्त्यात भीक मागून पोट भरणार्‍या महिलांना या तरुणाने हेलिकॉप्टरची सफर घडवून आणल्याने आकाशात भरारी घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.