मोर्चातच अस्वस्थ वाटलं; जनआक्रोश मोर्चात घोषणा देणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदे यांचा अचानक मृत्यू

ठाण्यात काल पार पडलेल्या जनआक्रोश मोर्चात अस्वस्थ वाटू लागल्याने दुर्गा भोसले शिंदे यांना मुंबईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

मोर्चातच अस्वस्थ वाटलं; जनआक्रोश मोर्चात घोषणा देणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदे यांचा अचानक मृत्यू
Durga Bhosle ShindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 10:11 AM

मुंबई : ठाण्यात काल ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. रोशनी शिंदे या शिवसेना पदाधिकारी महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती. शिवसेनेतील फुटीनंतरचा हा पहिलाच मोर्चा होता. त्यामुळे सर्वच शिवसैनिक या मोर्चाला एकवटले होते. यावेळी पोटतिकडीने घोषणा दिल्या जात होत्या. सरकारचा निषेधही नोंदवला जात होता. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे या सुद्धा मोर्चात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवत होत्या. मात्र, घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

युवा सेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले या मुंबईच्या कंबाला हिल परिसरात राहतात. त्या अवघ्या 30 वर्षाच्या आहेत. त्या मोर्चासाठी काल ठाण्यात आल्या होत्या. मोर्च्यात मोर्चेकऱ्यांसोबत त्या चालत होत्या. सरकार विरोधात त्याही घोषणा देत होत्या, घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागल्याने त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने विश्रांती घेण्यास सागितले. तसेच त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईला पाठवले. दुर्गाताई यांना लगेचच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

संध्याकाळी अंत्यसंस्कार

दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या मागे पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे. आज सायंकाळी 5 वाजता धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

श्रद्धांजली वहावी असं तुमचं वय नाही

दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या निधानावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ताई परवाच आपले फोनवर बोलणे झाले आणि ताई तुम्ही हिंगोली जिल्ह्यात पक्षाची चांगली बांधणी करा असा सल्ला दिला. आपलं विविध विषयांवर बोलणे झालं. पण ताई तुमच्या अश्या अचानक सोडून जाण्याने आमचा आधारवड गेला. श्रद्धांजली वहावी असं तुमचं वय नाही… दुर्गा ताई. विश्वास बसत नाही या दुःखद वृत्तावर. सदैव हसतमुख, खूप प्रेमळ अशी आपली सर्वांचीच प्रचंड लाडकी दुर्गाताई अचानक आपल्याला सोडून गेली, अशी प्रतिक्रिया डॉ. रेणुका पतंगे यांनी व्यक्त केली आहे.

राजकारणातील धडपडणारी महिला गेली

आपले संपूर्ण तारुण्य तिने पक्षाच्या उन्नतीसाठी खर्च केले. लग्नानंतरही हा समाजसेवेचा पिंड सोडला नाही. शिवसेनीतील बंडानंतरही नेतृत्वासोबत प्रामाणिक राहात तिने पक्षाचे काम केले. अगदी कालपर्यंत तिच्या फेसबुकवर शेयर केलेल्या पोस्टवरून कळते की ती पक्षासोबत किती एकनिष्ठ होती. राजकारणातील एक तरुण आणि धडपडणारी महिला जाण्याने अत्यंत दुःख झाले आहे, असं पूजा मोरे यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.