Mumbai | नाताळदिनी मुंबईत शून्य कोविड बळी, डिसेंबर महिन्यात सहाव्यांदा असं घडतंय!
या महिन्यात यापूर्वी 11 डिसेंबर , 15 डिसेंबर, 18 डिसेंबर , 20 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला यापूर्वी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. दरम्यान, सगळ्यात आधी 17 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मुंबई : नाताळदिनी समोर आलेला मुंबईचा कोविड रिपोर्ट हा दिलासादायक होता. एकाही कोरोना बळीची नोंद आज करण्यात आलेली नाही. डिसेंबर महिन्यात सहाव्यांदा मुंबईत एकही कोविड बळी न गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
नाताळदिनी किती नवे रुग्ण?
मुंबईत आज 757 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गेल्या 24 तासांत आढलेली रुग्णवाढ ही 24 जूननंतरची सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. 24 जूनला मुंबईत 789 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्णवाढीच्या वेगानं चिंता व्यक्त केली जाते.
देशासह राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं रात्रीच्या वेळी जमावबंदीसह पुन्हा काही निर्बंध जारी केले आहेत. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग पाहता वेळी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातंय. अशातच आता पुन्हा एकदा मुंबई 24 जूननंतरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.
शून्य कोविड बळी
दरम्या, डिसेंबर महिन्यात सहाव्यांदा दिलासादायक दिवस पाहायला मिळाला असून आज एकाही कोविड बळीची नोंद करण्यात आलेली नाही. या महिन्यात यापूर्वी 11 डिसेंबर , 15 डिसेंबर, 18 डिसेंबर , 20 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला यापूर्वी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. दरम्यान, सगळ्यात आधी 17 ऑक्टोबर 2021 रोजी पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली होती. कोविड महामारी सुरु झाल्यानंतर 17 ऑक्टोबरपर्यंत एकदाही मृत्यूबाबत दिलासा मिळालेला नव्हता. दरम्यान, त्यानंतर हळूहळू मुंबईतील परिस्थिती सुधारली असून आता मृत्यूदरही हळूहळू आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या मुंबईत 3703 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 280 रुग्ण गेल्या दिवसभरात बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना बरे होण्याचा दर हा 97% इतका नोंदवण्यात आला आहे.
#CoronavirusUpdates 25th December, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 757 Discharged Pts. (24 hrs) – 280
Total Recovered Pts. – 7,47,538
Overall Recovery Rate – 97%
Total Active Pts. – 3703
Doubling Rate – 1338 Days Growth Rate (18 Dec – 24 Dec)- 0.05%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 25, 2021
लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री?
महाराष्ट्रासह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत. महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागमार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच लॉकडाऊन कधी लावला जाऊ शकतो याची माहितीच दिली आहे. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं.