Municipal Election Reservation Seats LIVE : नवी मुंबईत कोणता वॉर्ड कुणासाठी राखीव? जाणून घ्या
BMC, Vasai, virar election 2022 seats reservation announcement live news and updates : महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या आरक्षण सोडतीवरच निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे.
महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. आज राज्यातील 14 महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. या आरक्षण सोडतीवरच निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा यामध्ये समावेश आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
ठाणे महापालिका सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण 5 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती तर 17 सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पूर्ण
ठाणे महानगरपालिकेच्या सन 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित
यामध्ये 5 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती तर 17 सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.
-
सोलापूर महापालिकेची महिला आरक्षण सोडत जाहीर; 57 जागा महिलांसाठी राखीव
सोलापूर महापालिकेसाठी एकूण 38 प्रभागामार्फत 113 जागांसाठी निवडणूक होणार
यामध्ये 57 जागा महिलांसाठी राखीव तर 57 पैकी 8 जागा एससी आणि 1 जागा एसटी महिलांसाठी राखीव तर उर्वरीत 48 जागा या महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार
महिला आरक्षणानंतर भावी नगरसेवक आणि नगरसेविकामध्ये जबरदस्त चुरस दिसून येणाराय.
– एकूण सदस्य संख्या : 113
– एकूण प्रभाग : 38
– एकूण महिला राखीव जागा : 57 – 57 पैकी सर्वसाधारण महिला प्रवर्ग : 48 – 57 पैकी महिला अनुसुचीत जाती : 8 – 57 पैकी महिला अनुसुचीत जमाती : 1
-
-
ठाणे महानगरपालिकचे प्रभाग रचनेनुसार आरक्षण; दोन प्रभाग आरक्षित होणार
ठाणे मनपाची प्रभागरचना
एकूण प्रभाग 47 नगरसेवक संख्या 142 त्रिसदस्य प्रभाग 46 चार सदससीय प्रभाग 1 अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग 10 अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग 05 अनुसूचित जमाती प्रभाग संख्या 03 आरक्षित होणारे प्रभाग 2
खुला प्रभाग 129 महिला 64
अनुसूचित जाती
प्रभाग क्रमांक – 3अ,10अ ,12अ ,15 अ, 23 अ, 24 अ, 27 अ, 29 अ, 34 अ, 44अ,
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 3अ, 12अ, 15अ, 23अ, 29अ
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक – 6अ, 29ब, 5अ
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक -( प्रभाग 1 ते प्रभाग 47 – क ), 4ब,7ब, 8ब, 9ब, 11ब, 14ब, 17ब, 19ब, 22ब, 28 ब, 30ब, 31ब, 33ब,35 ब, 37ब, 38ब, 40ब
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग क्रमांक – 1अ, 2अ ,4अ , 7अ , 8अ , 9अ , 11अ, 13अ, 14अ, 16ते 22अ, 25 अ, 26अ, 28 अ, 30 ते 33 अ, 35te43 अ, 45ते 47 अ
-
वसई विरार शहर महापालिकेचे 42 प्रभागाच्या 126 सदस्यांसाठी आज आरक्षण जाहीर;
वसई विरार शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 2022 च्या होणाऱ्या निवडणुकीसाठी 42 प्रभागाच्या 126 सदस्यांसाठी आज आरक्षण जाहीर
येणारी निवडणूक पॅनल प्रमाणे त्रिसदस्यीय निवडणूक होणार असल्याने, सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला याचा मोठा फायदा होणार
इतर शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार
या आरक्षण सोडती नंतर उद्या 1 जून ते 6 जून पर्यंत हरकती घेण्यासाठी वेळ दिला
-
कल्याण डोंबिवली महानगर पालिका आरक्षण सोडत जाहीर; सर्वसाधारण महिलांसाठी 58 जागा राखीव
महानगरपालिका एकूण नगरसेवक संख्या – 133
प्रभाग संख्या – 44
चार चे पॅनल – 1
तीन चे पॅनल – 43
अनुसूचित जाती – 13 जागा ( 7 महिला )
अनुसूचित जमाती – 4 जागा ( 2 महिला )
सर्वसाधारण – 116 जागा ( 58 महिला )
महिला आरक्षण – 67
-
-
ठाणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर 47 प्रभागातील, 142 सदस्यांसाठी आरक्षण जाहीर
– ठाणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर 47 प्रभागातील, 142 सदस्यांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर.
– अनुसूचित जाती साठी 10 जागा राखीव या पैकी 5 महिलासाठी राखीव
– अनुसूचित जमाती साठी 3 जागा राखीव या पैकी 2 महिलांन करिता राखीव,
– सर्वसाधारण खुला प्रवर्ग 129 जागा आहेत तर यात 71 जागा महिलांसाठी जागा राखीव.. तर 71 पुरुष एकूण 14
– ही सर्व आरक्षणाची सोडत कोणतेही हरकत न घेता ठाण्यातील काशिनाथ घाणेकर या नात्यागृहात पार पडला..
-
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत आज पार पडली.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग, तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे.
139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष, तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल.
70 पैकी 57 जागा खुल्या प्रवर्गासाठी तर 11 जागा अनुसूचीत जाती महिला साठी राखीव आहेत, तर 2 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव
या सोडती नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही सोडत अनुकूल असल्याचा दावा केला आहे. सोडतीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बातचीत केली आहे.
-
नवी मुंबईत 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित
नवी मुंबईत 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित, जाणून घ्या कोणत्या वॉर्डमध्ये कुणाला आरक्षण? वाचा सविस्तर
-
पुणे महापालिकेची महिला आरक्षण सोडत जाहीर
पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठीचे तर पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. वाचा सविस्तर
-
राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेला जामीन मंजूर
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण,
– राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेला जामीन मंजूर,
– शिवाजीनगर कोर्टाने केला जामीन मंजूर,
– तुकाराम सुपेला सायबर पोलिसांनी 17 डिसेंबरला अटक केली होती,
– 5 महिन्यानंतर तुकाराम सुपेला जामीन मंजूर,
– तुकाराम सुपेकडून पोलिसांनी 2 कोटी 34 लाख रुपये आणि 65 लाखांचे दागिने जप्त केले होते.
-
अमरावती महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; 49 जागा महिलांसाठी राखीव
अमरावती महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर
33 प्रभागातील 98 सदस्या साठी आरक्षणाची सोडत जाहीर
49 जागा महिलांसाठी राखीव
अनुसूचित जाती साठी 17 जागा राखीव यापैकी 9 एससी महीलांसाठी
2 जागा ST साठी पैकी 1 जागा महिलांसाठी राखीव
-
नागपूर महापालिका निवडणूक आरक्षण सोडत
नागपूर महापालिका निवडणूक आरक्षण सोडत
अनुसूचित जमाती महिलांसाठी 6 जागा
प्रभाग क्रमांक 24 ,11 , 37,12, 4 आणि 51 आरक्षित
-
नाशिक मनपा निवडणुकीसाठी सर्वसाधारण महिलांच्या 12 जागेसाठी सोडत जाहीर
नाशिक मनपा निवडणुकीसाठी सर्वसाधारण महिलांच्या 12 जागेसाठी सोडत जाहीर
5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 30 ब, 31 ब , 32 ब, 33 ब, 36 ब, 37 ब हे प्रभाग सर्वसाधारण महिसांसाठी आरक्षित
-
पुणे महापालिका आरक्षण सोडत
1) अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग 9 यरवडा
प्रभाग 3 – लोहगाव विमाननगर
प्रभाग 42 रामटेकडी सय्यदनगर
प्रभाग 47-कोंढवा बुद्रुक
प्रभाग 49 – मार्केटयार्ड महर्षीनगर
प्रभाग 46- महम्मदवाडी उरळी देवाची
प्रभाग 20 पुणे स्टेशन आंबेडकर रोड
प्रभाग 26 – वानवडी वैदुवाडी
प्रभाग – 21 कोरेगाव पार्क मुंढवा
प्रभाग 48 – अप्पर इंदिरानगर
प्रभाग- 10 शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
प्रभाग – 4 खराडी वाघाली
2) अनुसूचित जमाती आरक्षित प्रभाग
प्रभाग 1 क्र. 1 ब महिला
प्रभाग 14 अ – एसटी खुला
-
मुंबई महापलिका निवडणूक सोडतील सुरुवात
मुंबई महापलिका निवडणूक सोडतील सुरुवात मुंबई शहराची एकूण लोकसंख्या 12442373 अनुसूचित जमातीसाठी 2 जागा अनुसूचित जातीसाठी 15 जागा सर्व साधारण महिलांसाठी 109 जागा अशा पद्धतीने जाहीर होणार आरक्षणाची सोडत
-
वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार ओबीसी अरक्षणाशिवाय 48 प्रभागासाठी होणार आरक्षण सोडत
महापालिकेत 126 नगरसेवकांची संख्या
1 जून ते 6 जूनपर्यंत घेता येणार आरक्षणावर हरकत
-
कल्याण डोंबिवली महापालिकेची आरक्षण सोडत थोड्याच वेळात
कल्याण डोंबिवली महापालिकेची आरक्षण सोडत थोड्याच वेळात
केडीएमसीत एकूण 133 जागांसाठी होणार आरक्षण सोडत जाहीर
133 जागापैकी 13 जागा अनुसूचित जाती, 4 जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित होणार
तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 116 जागा
महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार 67 जागा
-
नागपूर मनपा निवडणूकीसाठी आरक्षण सोडत सुरू
नागपूर मनपा निवडणूकीसाठी आरक्षण सोडत सुरू
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी वगळता आरक्षण सोडत
आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाची सोडत
कोणता वॅार्ड कोणासाठी आरक्षित याकडे राजकीय पकक्षाचे लक्ष
नागपूर मनपाचे एकूण 52 प्रभाग
156 जागांपैकी 78 जागा महिलांसाठी असणार आरक्षित
Published On - May 31,2022 11:10 AM