दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!

कोरोनाची साथ आल्यापासून महापालिकेने अतिक्रमण हटावची कारवाई बासनात गुंडाळली. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या शालीमार, रविवार कारंजा, सीबीएस, शरणापूररोड, गंगापूररोड, सिडको आदी भागांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.

दिवाळीनंतर नाशिकमध्ये पाडापाडी; सोमवारपासून अतिक्रमणांवर महापालिकेचे बुलडोझर!
नाशिक महापालिका.
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 9:42 AM

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दिवाळीनंतर पुन्हा एकदा नाशिकमधील अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर फिरणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या गरमागरम चर्चेनंतर ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी, उद्योनगरी, स्वच्छ आणि सुंदर शहर ही नाशिकची ख्याती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहराची बकालपणाकडे वाटचाल सुरूय. कोरोनाची साथ आल्यापासून महापालिकेने अतिक्रमण हटावची कारवाई बासनात गुंडाळली. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या शालीमार, रविवार कारंजा, सीबीएस, शरणापूररोड, गंगापूररोड, सिडको आदी भागांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. अनेकांनी रस्त्यावर वाहने लावून उद्योग सुरू केला, तर कोणी रस्त्यावरच दुकान थाटले. भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे. रस्ते अरूंद झाले आहेत. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते आहे. हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावर गरमागरम चर्चा झाली. त्यामुळे सभापती गणेश गिते यांनी दिवाळीनंतर दहा दिवसांत अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या दालनात बैठक झाली. त्यांनी या बैठकीत सोमवारपासून अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

जोरदार खडाजंगी

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अतिक्रमणांवरून जोरदार खडाजंगी झाली. शहराचा विकसित आणि पॉश भाग म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. मात्र, येथे अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. आकाशवाणी टॉवर जवळ भाजी विक्रेत्यांनी ठिय्या मांडल्याचा मुद्दा योगेश हिरे यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी या विक्रेत्यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. इथले बेकायदा भाजी विक्रेते नाही हटवल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. सातपूर येथे खुल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा प्रश्न माधुरी बोलकर यांनी बैठकीत मांडला. प्रतिभा पवार यांनी सिडकोतल्या आपल्या प्रभागात अतिक्रमण झाल्याचे सांगितले. हॉकर्स झोनची उभारणी केली. मात्र, तरीही रस्त्यावर अतिक्रमणे आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या अतिक्रमणांवर दिवाळीनंतर कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती सभापतींनी दिले आहेत. (Municipal Corporation’s encroachment removal campaign in Nashik from Monday)

इतर बातम्याः

महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये 43 प्रभाग 3 सदस्यीय, तर 1 असेल चौघांचा!

Jobs: ऐन दिवाळीत गोड बातमी, सिपेट प्रकल्प नाशिकमध्ये होणार; हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.