मस्तकात तिडीक उठली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मालक-नोकराच्या भांडणात मालकिणीवर… जालन्यात काय घडलं?
मालक आणि मालकिणीसोबत वाद झाल्यानंतर त्याचा राग डोक्यात गेल्याने नोकर त्यांच्या जीवावारच उठल्याची घटना जालन्यात घडली. आपापसातील वादाचे रुपांतर एवढ्या भयंकर घटनेत होऊ शकते, याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही.
जालनाः फुटकळ भांडण किंवा वादावादीवरून एकमेकांचा राग येणं आणि त्यातून एखाद्याच्या जीवावर उठण्याच्या घटना हल्ली वारंवार समोर येत आहेत. जालन्यातदेखील अशीच घटना (Jalna crime) घडली. मालकीण आणि मालक रागावल्याने घरातल्या नोकराला राग आला. त्याने घरातल्या काचा फोडल्या. त्यातली काच मालकाच्या पायात घुसल्याने मालकाने नोकराला बुक्क्यांनी मारहाण केली. या भांडणातून दोघेही पोलिसात तक्रार करायला गेले. ही घटना इथेच संपत नाही. पोलिसांनी या दोघांनाही उपचारासाठी जाण्यास सांगितले. पण नोकर त्याच्या घरी न जाता थेट मालकिणीकडे गेला. तिच्यावर चाकूचे सपासप वार केले आणि स्वतः विष घेतले. (Murder) या घटनेत मालकीणीचा मृत्यू झाला. तर नोकर तिथेच बेशुद्ध पडला.
40 वर्षांपासून काम करणारा नोकर
आलोकचंद आणि पत्नी संगीता लाहोटी हे दोघेजण जालना शहरात राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत तर मुलगी अकोल्यात राहते. नोकर भीमराव हा त्यांच्याकडे चाळीस वर्षांपासून कामाला आहे. संगीता योग शिक्षिका होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे महिला येत असत. मंगळवारी नोकर एका महिलेशी बोलत होता व तिला मोबाइल नंबर मागत होता. यावरून मालकांनी त्याला चांगलेच झापले. याचाच राग येऊन नोकराने घरातल्या काचा फोडल्या. मालकानेही त्याला मारहाण केली. या वादामुळे दोघेही सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले. महिला पोलिसाने दोघांनाही उपचारासाठी जा, नंतर दोघांचीही तक्रार घेते, असे सांगितले. मात्र नोकराने थेट घरी जाऊन घर बंद करून घेतले. आत घुसून चाकूने किचनमधील संगीता यांच्या पोटावर, छातीवर वार केले. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नोकराने विष प्राशन केल्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला. तोपर्यंत मालक घरी आले. परंतु दरवाजा बंद असल्याने त्यांनी पोलिसांना माहती दिली.
मालक घरी येईपर्यंत खून
पोलिसांनी घरी येऊन दरवाजा उघडून पाहिला असता संगीता लाहोटी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. जखमी नोकराला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हत्या झालेल्या घरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी पुराव्यांची नोंद घेतली.
इतर बातम्या-