VIDEO| माझी दारं चर्चेसाठी खुली, अनिल परबांचं एसटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन
दुपारी 3 वाजता GR काढला. 4 वाजता 3 सदस्यीय बैठक घेतली, 5 वाजता बैठक पुन्हा घेऊन मिनिट्स दिलेत. कोर्टाच्या अंतिम आदेशाची प्रत मिळाली नाही, ते मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलंय.
मुंबई: गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे परिवहन मंत्री अनिल परबांनीही एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेचं आवाहन केलंय. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही समिती गठीत केली. दुपारी 3 वाजता GR काढला. 4 वाजता 3 सदस्यीय बैठक घेतली, 5 वाजता बैठक पुन्हा घेऊन मिनिट्स दिलेत. कोर्टाच्या अंतिम आदेशाची प्रत मिळाली नाही, ते मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलंय.
आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यावर विचार करू
परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने प्रयत्न केले, त्यानंतर कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आम्ही पालन केले. जर कोणी कोर्टाचा अपमान करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यावर विचार करू. विलगीकरणाच्या मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्यात. हे काम 1-2 दिवसात होत नाही, त्यासाठी प्रक्रिया आहे. उच्च न्यायालयाचा अवमान झाला म्हणून याचिका होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलंय.
तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही
खासगी वाहन हे अतिरिक्त पैसे आकारत असेल, तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही, कारवाई करेल, असा इशाराही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय. भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याचं काम केल्यास त्याचा लोकांना त्रास होत आहे. माझी दारं चर्चेसाठी खुली असल्याचंही परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधोरेखित केलेय.
तर 31 कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले असते
दरम्यान, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काल परत बीडमधील एका एसटी कामगार बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या कर्मचाऱ्याला वाचवले असले तरी त्याची प्रकृती नाजूक आहे. आतापर्यंत 31 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेतंय आणि कोर्टाची दिशाभूल करतंय. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर 31 जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते. संबंधित बातम्या:
नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्राने देशाची माफी मागावी; संजय राऊत यांची मागणी