AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona Update : नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ! गरोदर आणि कोरोनाबाधित आहात? ऑनलाईन ओपीडी सुरु

गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Nagpur Corona Update :  नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ! गरोदर आणि कोरोनाबाधित आहात? ऑनलाईन ओपीडी सुरु
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 6:24 PM

नागपूर : राज्यात करोनोचा प्रादुर्भात दिवसेंदिवस वाढतोय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. नागपुरात तर आज आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी गरोदर मातांना कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यांच्यासाठी आता नागपुरात ओपीडी सुरु करण्यात आली आहे. (Most corona patients in Nagpur today, some doctors start OPD for corona patients)

ऑनलाईन ओपीडी सुरु

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशावेळी खासगी आणि सरकारी रुग्णालयात बेड मिळत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर उपाय म्हणून शहरातील काही डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केलीय. शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांनी कोरोनाबाधित गरोदर महिलांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केली आहे.

एखादा व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्यावर नेमकं काय करायचं असा प्रश्न त्याला पडतो. ज्यांना प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जाणं शक्य नाही. त्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑनलाईन ओपीडीचा चांगला फायदा होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात याबाबत जनजागृती करत असल्याचं सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सांगितलं.

आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ

गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 868 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपूर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता 42 हजार 933 वर जाऊन पोहोचली आहे.

नागपूरमध्ये कोरोना चाचणी कशी होते? (How to do corona test in Nagpur)

एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायची असेल तर नागपुरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते.

नागपुरात टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत.  त्या ठिकाणी RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. जवळपास 200 केंद्रांवर ही टेस्ट होते. सोबतच खाजगी रुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.

संबंधित बातम्या :

Nagpur Corona | दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं

राज्यात मर्यादित लॉकडाऊनची चर्चा, “कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय घेणार नाही”-नितीन राऊत

Most corona patients in Nagpur today, some doctors start OPD for corona patients

सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.