भाजप सरकारच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम, थकबाकी असेल तर गरिबांना सवलत दिल्यामुळे- फडणवीस

वीज बिलावरुन महाविकास आघाडी सरकारनं घुमजाव केलं आहे. हा मुद्दा आम्ही निवडणुकीत मांडणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. या सरकारकडून शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळणार नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.

भाजप सरकारच्या काळात ऊर्जा विभागाचं काम उत्तम, थकबाकी असेल तर गरिबांना सवलत दिल्यामुळे- फडणवीस
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 12:21 PM

नागपूर : भाजप सरकारच्या काळात 36 हजार कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागानं उत्तम काम केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. आमच्या काळात थकबाकी असेल तर त्याचा अर्थ आम्ही गरीबांना सवलत दिली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला लगावला आहे. (Devandra Fadnavis criticize CM Uddhav thackeray on electricity bill issue)

वीज बिलावरुन महाविकास आघाडी सरकारनं घुमजाव केलं आहे. हा मुद्दा आम्ही निवडणुकीत मांडणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. या सरकारकडून शेतकऱ्यांना वीज बिलात सूट मिळणार नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.

वीजबिल माफीसाठी भाजपचे होळी आंदोलन

राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात (Electricity Bill ) सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी (23 नोव्हेंबर) भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा राज्यात सर्वत्र वीजबिलांच्या होळीचे आंदोलन करणार आहे.

महावितरणला सर्वात मोठा फटका भाजपमुळेच- नितीन राऊत

भाजप सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने आणि वीजबिलांची वसुली न केल्याने महावितरणाला फटका बसला. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली आहे, असं म्हणत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजबिल माफी न देण्याचा चेंडू भाजपाकडे टोलवला आहे.

शिवसेनेच्या भगव्यामध्ये भेसळ- फडणवीस

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आहेत. त्यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारनं पदवीधरांचा, शिक्षकांचा भ्रमनिराश केल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेल्या शिवसेनेवर तोफ डागताना फडणवीस यांनी शिवसेनेच्या भगव्यामध्ये भेसळ झाल्याची खोचक टीका केलीय. शिवसेनेचा भगवा उरला नाही. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना आहे. त्यांचा भगवा कुठला? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

संबंधित बातम्या:

वीजबिल माफीसाठी भाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन

वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक; कुडाळमध्ये महावितरण कार्यालयावर कार्यकर्त्यांचे आंदोलन

सामान्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, ठाकरे सरकार दिलासा देणार? मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

Devandra Fadnavis criticize CM Uddhav thackeray on electricity bill issue

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.