कोरोना वाढतोय, गरज असेल तरच घराबाहेर पडा; नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान
नागपुरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. (nagpur district collector issued guidelines for new curbs in nagpur)
नागपूर: नागपुरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच त्यांनी नागरिकांना केलं आहे. (nagpur district collector issued guidelines for new curbs in nagpur)
नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाकरे यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच नागरिकांना केलं आहे. तसेच अनिर्बंधपणे वागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देतानाच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सक्त असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मंगल कार्यालयांवर कारवाई करणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सर्व मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरू नये म्हणून उद्या सोमवारपासून ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शाळा, महाविद्यालये बंद ठेवा
प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना चाचण्या करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उपाययोजना नसतील तर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्या शिवाय मॉल्स, सर्व प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट आणि मैदानांमध्ये गर्दी करू नका, असं आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
कामठी, काटोल, सावनेरवर विशेष लक्ष
कामठी, कटोल आणि सावनेरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कामठी, काटोल आणि सावनेरवर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्यात येणार असून घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी होण्याची शक्यताही आहे. त्या शिवाय सुपर स्प्रेडरचीही तपासणी करण्यात येणार आहे.
महाविद्यालयात 16 विद्यार्थ्यांना कोरोना
नागपुरातील कोरोनाचा रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपूर्वी आटोक्यात होती. मात्र येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाल्याचे होत असल्याचे दिसून येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी तब्बल 644 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाने खबरदारी म्हणून योग्य त्या उपायोजनांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपुरात आता कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवस आधीच परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. (nagpur district collector issued guidelines for new curbs in nagpur)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 : 30 PM | 20 February 2021 https://t.co/x6IJJFgAIR#Top9News #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
संबंधित बातम्या:
यवतमाळवर पुन्हा कोरोनाचं संकट, जिल्हाधिकारी रस्त्यावर, नव्याने निर्बंध लागू!
नागपुरात कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवसआधी परवानगी बंधनकारक; संचारबंदीचीही मागणी वाढली
पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर…!
(nagpur district collector issued guidelines for new curbs in nagpur)