नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ, भाजप समर्थित नागो गाणार यांचा अर्ज दाखल, अशी रंगणार लढत 

गेल्या वेळेस तगडी लढत देणारे शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यंदाही मैदानात असल्याने गाणार यांना मार्ग सोपा नाही. त्यात काँग्रेसच्या भूमिकेवर या मतदारसंघाची गणितं अवलंबून आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ, भाजप समर्थित नागो गाणार यांचा अर्ज दाखल, अशी रंगणार लढत 
नागो गाणार
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 4:31 PM

नागपूर : भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे शिक्षक उमेदवार नागो गाणार (Nago Ganar) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपचे नेते परिणय फुके, संदीप जोशी, गिरीश व्यास, आणि पूर्व विदर्भातील भाजप आमदारांच्या उपस्थितीत, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात नागो गाणार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. “माझा कोणी प्रतिस्पर्धी नाही, मी बारा वर्षे केलेल्या कामावर ही निवडणूक एकतर्फी जिंकेल” असा विश्वास यावेळी नागो गाणार यांनी व्यक्त केलाय. विधानपरिषदेच्या नागपूर विभागीय मतदारसंघात महाविकास आघाडीच बिघाडीची स्थिती आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे (Rajendra Zade) यांचा अर्ज भरलाय, तर महाविकास आघाडीचा घटक असलेल्या ठाकरे गटाकडून गंगाधर नाकाडे मैदानात उतरलेय.

काँग्रेसचे ‘वेट अँड वॉचच्या भुमिकेत आहे. इकडे भाजपने शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना पाठिंबा दिलाय…. महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याने, नागो गाणार यांचा गट सध्या उत्साही आहे.

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपकडून नागो गाणार यांना समर्थन जाहीर करण्यात आलंय. आ. नागो गाणार यांना भाजप कडून तिसऱ्यांदा समर्थन देण्यात आलंय.

“नागपूर मतदारसंघात शिक्षक परिषदंच निवडणूक लढवत आलीय. भाजप नेहमीच समर्थन देत असतेय. यावेळेसंही भाजपच्या समर्थनाने बहुमताने आम्ही ही निवडणूक जिंकू” असा विश्वास भाजप समर्थित शिक्षक उमेदवार नागो गाणार यांनी व्यक्त केलीय.

भाजपने तिसऱ्यांदा नागो गाणार यांना समर्थन दिलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागो गाणार यांच्या विजयासाठी कंबर कसलीय, तर दुसरीकडे या निवडणुकित महाविकास आघाडीत फूट पडण्याची स्थिती आहे.

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिक्षक भारतीने काँग्रेसच्या पाठिंब्याची वाट न पाहता राजेंद्र झाडे यांची उमेदवारी जाहीर केली, आणि उमेदवारी अर्जही भरलाय.

शिक्षक भारती पाठोपाठ महाविकास आघाडीचा दुसरा घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या शिक्षक शिवसेनेचे गंगाधर नाकाडे निवडणुकीच्या मैदानात उतरलेय. शिवसेना समर्थीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं.

‘वरिष्ठांच्या सूचनेवरून आपली निवडणूक रिंगणात असून राष्ट्रवादीने आपल्याला समर्थन दिलंय, असा दावा नाकाडे यांनी केलाय. तसंच ‘काँग्रेसनही समर्थन जाहीर करून नागपूरची जागा शिवसेनेसाठी सोडावी’, असं आवाहनही त्यांनी केलंय.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे नागो गाणार दोन वेळा निवडून आलेय…. यावेळेस तिसऱ्यांदा मात्र त्यांच्या नावाला भाजपच्या काही नेत्यांचा विरोध होता. पण भाजपची वाट न पाहता शिक्षक परिषदेने आधीच नागो गाणार यांच्या उमेदवारीची घोषणा केलीय.

शेवटी भाजपला नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर करावा लागलाय. पण गेल्या वेळेस तगडी लढत देणारे शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यंदाही मैदानात असल्याने गाणार यांना मार्ग सोपा नाही. त्यात काँग्रेसच्या भूमिकेवर या मतदारसंघाची गणितं अवलंबून आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.