AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन दारुविक्रीला परवानगी; सलून, शॉपिंग मॉल बंद, नागपुरात कोणत्या दिवशी काय सुरु?

लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी (Nagpur Liquor Shop Open)  जारी केले.

ऑनलाईन दारुविक्रीला परवानगी; सलून, शॉपिंग मॉल बंद, नागपुरात कोणत्या दिवशी काय सुरु?
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 12:20 AM

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Nagpur Liquor Shop Open) आहे. मात्र राज्य सरकारने तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथीलता देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार उद्यापासून नागपुरात ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक असणार आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरु राहतील.

नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने 11 मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील. तेथे बांधकाम सुरु करता येईल.

‘या’ दिवशी ही दुकानं सुरु राहणार

  • आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवारी सुरु राहणार आहेत.
  • ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप हे मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सुरु राहतील.
  • ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारी सुरु राहतील.

ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये 15 टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरु करता येतील.

प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत सुरु असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहेत, ती दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील.

हे सुरु राहणार

  • केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा‌ वापर
  • एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.
  • दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.
  • आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणं, त्यासाठी लागणारे साहित्य
  • नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था
  • आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन
  • नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून
  • इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)
  • कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल
  • प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता सुरु
  • इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)
  • ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)
  • ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)
  • ऑनलाईन मद्यविक्री
  • ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)
  • खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत (सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)
  • मान्सूनपूर्व सर्व कामे
  • २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.

दरम्यान जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम इत्यादींना मात्र परवानगी राहणार नाही.

मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरु करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावे लागतील. सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील.

लॉकडाऊनकाळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

‘हे’ बंद राहणार 

  • सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)
  • प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)
  • आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)
  • मेट्रो रेल्वे सेवा
  • सर्व शाळा, महाविद्यालाये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)
  • सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी
  • सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम
  • सर्व धार्मिक स्थळे
  • सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा
  • टॅक्सी आणि कॅब सेवा
  • जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा
  • सलून आणि स्पा
  • सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग

(Nagpur Liquor Shop Open)

संबंधित बातम्या : 

Pune Corona Discharge | पुण्यात कोरोनाबाधित डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या वाढली, 12 दिवसात 937 जणांना डिस्चार्ज‬

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.