महाराष्ट्रावर शोककळा, पाकिस्तान गोळीबारात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण

पाकिस्तानने शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला.

महाराष्ट्रावर शोककळा, पाकिस्तान गोळीबारात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 7:42 AM

नागपूर : पाकिस्तानने (Pakistan) शुक्रवारी (13 नोव्हेंबर) केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील भूषण सताई हे जवान शहीद (Bhushan Satai martyred) झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते मराठा बटालियनमध्ये नायक पदावर तैनात होते. ऐन दिवाळीत दोन जवानांना वीरमरण आल्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. (nagpur soldier Bhushan Satai martyred in jammu and kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण सताई हे श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. पाकिस्तानने शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, यामध्ये दोन जवानांना वीरमरण आलं. कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे हेदेखील या गोळीबारात शहीद झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, भूषण सताई हे अवघे 28 वर्षांचे होते. ते 2011 मध्ये सैन्यात भर्ती झाले होते. त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे काटोलमध्ये शोककळा पसरली असून 12 वाजता भूषण यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी आणलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे हेदेखील या गोळीबारात शहीद झाले आहेत. (rushikesh jondhale martyred in jammu and kashmir) पाक सैन्याकडून शुक्रवारी पहाटेपासूनच वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.

पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार गोळीबार सुरु होता. भारतीय जवानांनीदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात अवघ्या 20 वर्षांचे महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

पाकिस्तानी सैन्याने आज सीमारेषेवर बारामुल्ला, गुरेज, उरी, कुपवाडा, पुँछ या भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात काही सर्वसामान्य नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे. पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या 7 ते 8 सैनिकांचा खात्मा केला. तर 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना जखमी केलं.

संबंधित बातम्या – 

Jammu and Kashmir | कुपवाड्यात जवान आणि दहशतवादी आमनेसामने, तिघांना कंठस्नान, पण एक अधिकारी आणि तीन जवान शहीद

Rishikesh Jondhale | पाकच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र ऋषीकेश जोंधळे शहीद

(nagpur soldier Bhushan Satai martyred in jammu and kashmir)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.