Vidhan Sabha Election 2024: मविआच नव्हे तर राज ठाकरेही देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणार? फडणवीस यांच्या मतदार संघात अशी रंगणार लढत
Nagpur South West Assembly constituency Election 2024: संमिश्र वस्ती असलेल्या या मतदार संघात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच नाही तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भाजपचा विजय प्रतिष्ठेचा आहे. फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष मिळून आघाडी उघडणार आहे. त्यावेळी फडणवीस यांचे मित्र राज ठाकरेसुद्धा त्यांच्या विरोधात प्रचार सभा घेण्याची शक्यता आहे.

Nagpur South West Devendra Fadnavis Assembly constituency : महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, मुख्यमंत्री पदाचे दावेदार अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू व्यक्तीमत्व असलेले देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढत असतात. हा मतदार संघ भाजपसाठी अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महत्वाचा आहे. कारण भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये आहे. संघाच्या संघटन कौशल्याचा फायदा भाजपला नागपूरमध्ये अधिक होत असतो. या मतदारचा इतिहास पहिल्यावर त्यावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 1978 पासून या मतदार संघात 7 वेळा भाजपने विजय मिळवला. 2 वेळा काँग्रेसने भाजपला रोखले. परंतु 2024 ची लढत भाजपसाठी सोप असणार नाही. यंदा फक्त भाजपचेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असलेले राज ठाकरे यांच्या मनसेचे आव्हान भाजपला असणार आहे. यंदा देवेंद्र फडणवीस विरोधात मनसेकडून उमेदवार देण्याची तयारी चालली आहे. त्यासाठी नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राज्यात भाजपची अन् महायुतीची धुरा सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मतदार संघावर लक्ष द्यावे लागणार आहे. ...