AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | नागपुरात ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ यशस्वी, जवळपास 75 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

नागपूर राज्याची उपराजधानी दिवसेंदिवस कोरोनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे.

Nagpur Corona | नागपुरात 'तुकाराम मुंढे पॅटर्न' यशस्वी, जवळपास 75 टक्के रुग्णांची कोरोनावर मात
Follow us
| Updated on: May 24, 2020 | 4:01 PM

नागपूर : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत (Nagpur Tukaram Mundhe Pattern) आहे. शहरासोबतच आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोना मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा कंटेनमेंट झोन तयार व्हायला सुरवात झाली आहे. मात्र, शहरात कोरोनाला आटोक्यात ठेवण्यासाठी ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ चांगलाच प्रभावी (Nagpur Tukaram Mundhe Pattern) ठरत आहे. शहरातील जवळपास 75 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नागपूर राज्याची उपराजधानी दिवसेंदिवस कोरोनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रातील सतरंजीपुरा हा कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट ठरला आहे. त्या ठिकाणी एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि कोरोनाचा फैलाव वाढला.

त्याचप्रमाणे दुसरा हॉटस्पॉट मोमीनपुरा ठरला, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु झाला आणि महापालिका आयुक्तांनी या भागात मोहीम उघडत सतरंजीपुरा भागातून 1900 च्या जवळ तर मोमीनपुरा भागातून जवळपास 800 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं. हे दोन्ही भाग पूर्णतः सील करण्यात आले आहे. पोलीस आणि एआरपीएफ या भागात तैनात करण्यात आली आहे.

या भागातील नागरिक बाहेर पडू नये किंवा कोणी या भागात जाऊ नये म्हणून सर्वत्र टीना लावून एरिया सील केला. याचा चांगला परिणामही झाला. मात्र नागपुरातील एक नवीन हॉटस्पॉट प्रशासनासाठी डोके दुखी ठरत आहे. गड्डीगोदाम हा कोरोनाचा नीव हॉटस्पॉट झाला आहे. या भागातसुद्धा कडक बंदोबस्त लावून 400 च्या जवळ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या प्रमाणेच काही भागात छोटे कंटेनमेंट झोन सुद्धा तयार झाले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अशीच पद्धत अवलंबिण्यात आली आहे. यात पार्वती नगर, पांढराबोडी, टेका नाका, शांतीनगर, ताजबाग, जवाहरनगर यांचा समोवेश (Nagpur Tukaram Mundhe Pattern) आहे.

कसा आहे ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’?

हॉटस्पॉट असलेला सतरंजीपुरा भागात 1900 नागरीक क्वारंटाईन

  • रुग्ण – 103
  • मृत्यू – 1
  • कोरोनामुक्त – 102

मोमीनपुरामध्ये 800 जण क्वारंटाईन

  • रुग्ण – 186
  • मृत्यू – 2
  • कोरोनामुक्त – 149

गड्डीगोदाम 400 च्या जवळपास नागरीक क्वारंटाईन

  • रुग्ण – 20
  • मृत्यू – 1
  • कोरोनामुक्त – 00

टिमकीमध्ये 100 क्वारंटाईन

  • रुग्ण – 13
  • मृत्यू – 0
  • कोरोनामुक्त – 7

पार्वती नगर 300 जण क्वारंटाईन

  • रुग्ण – 3
  • मृत्यू – 1
  • कोरोनामुक्त – 2

अशाच प्रकारे इतर भागात सुद्धा रुग्ण आणि त्यांच्यावर उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

या भागात केलेल्या उपाय योजना

– पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच परिसर सील

– नागरिकांना क्वारंटाईन करुन फैलाव थांबविणे

– संपूर्ण एरिया सॅनिटाईझ करणे

– परिसरात आरोग्य तपासणी

– क्षयरोग तपासणी

– गर्भवती महिलांची तपासणी

– परिसरात पोलीस आणि एसआरपीएफ तैनात करुन नागरिकांना बाहेर पडण्यास किंवा त्या भागात कोणाला जाण्यास मज्जाव करणे

अशाप्रकारे शहरी भागात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उपाय योजना राबविल्या आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. शहरात रुग्ण संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी वाढली आहे. जवळपास 75 टक्के नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

– नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या – 419

– कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या – 317

– एकूण मृत्यू – 7

याचं सगळं श्रेय तुकाराम मुंढेसह कोरोना योद्ध्यांचं आहे. त्यात डॉक्टर, नर्स आणि पेरामेडिकल स्टेपसह पोलिसांचा समावेश आहे.

नागपूर शहरासोबत आता ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा फैलाव सुरु झाला आहे. कळमेश्वर तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला, तर दुसरा मुंबईहून आलेला दहेगावचा युवक कोरोना पॉझिटिव्ह निघाला. बुटीबोरीमध्ये वडील आणि मुलगा दोघंही पॉझिटिव्ह आढळून आले. सोबतच कामठीमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण भागात (Nagpur Tukaram Mundhe Pattern) आता चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या :

कोकणात कोरोनाचा कहर, रत्नागिरीत 7 नवे रुग्ण, तर सिंधुदुर्गात आठ जण पॉझिटिव्ह

India Corona Update | 24 तासात देशात 6,767 नवे रुग्ण, 147 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, एकाच दिवसात राज्यात 87 पोलीस पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.