Video : Nagpur | नागपुरात जमीन विक्रीच्या नावाखाली 18.22 कोटींची फसवणूक; चार जणांच्या घरांवर धाड
नागपुरात भूखंडाच्या हेराफेरी प्रकरणी अनेकांची फसवणूक झाली आहे. चार आरोपींच्या घरांवर पोलिसांच्या आर्थिक शाखेनं ही धाड टाकली. आता हे आरोपी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले.
नागपूर : नागपुरात जमीन विक्रीच्या नावाखाली 18.22 कोटींची फसवणूक प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक शाखेनं चार जणांच्या घरांची झाडाझडती घेतली. यात सीएम नारायण डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे यांच्या घरांचा समावेश आहे. चिंचभवन परिसरातील (Chinch Bhavan Premises) जमीन विक्रीच्या नावाखाली व्यावसायिक अली आणि वासाडे यांची 18.22 कोटींची फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशाने सीए डेमले, त्यांचा मुलगा अतुल डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे विरोधात गुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय. याच प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (Crimes Branch) धाडसत्र राबवलंय. या धाडीत काही कागदपत्र सापडल्याची माहिती आहे. दरम्यान जमिनीचा व्यवहार करून सीए डेमले आणि रमाणीसह नागपुरातील अनेक लोकांची फसवणूक केलीय असा आरोप तक्रारदार नावेद अली (Complainant Naved Ali ) यांनी केलाय.
पाचही आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा
नावेद अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2006 ते 2008 या कालावधीत पाच हजार स्वेअर फूटसाठी पैसे देऊन आरोपींकडून जमीन खरेदी केली. एका वर्षानंतर आठ एकर जागा सरकारी जागेत आहे, हे माहीत झाले. 2017 एसआयटीसमोर आम्ही हे सर्व करून देऊ, असं सांगितलं. पण, काही झालं नाही. त्यामुळं गेल्या वर्षी पोलिसांत तक्रार दिली. प्रकरण कोर्टात गेले. 156 अंतर्गत कोर्टाने आदेश दिले. त्यानुसार, पाच आरोपींविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला. आता हे आरोपी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले.
सुमारे 30-40 लोक फसविले
नागपुरात भूखंडाच्या हेराफेरी प्रकरणी अनेकांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सीए डेमले, रमाणीसह चार जणांच्या घरावर धाडसत्र सुरू झालंय. नागपूर पोलिसांच्या आर्थिक शाखेनं ही धाड टाकली. जमीन विक्रीच्या नावाखाली 18.22 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या आरोपींविरोधातील काही प्रकरण 2006-07 ची आहेत. यामध्ये सुमारे 30-40 लोक फसविले गेले आहेत. तक्रारदारांनी समोर यावं, हे मोठं रॅकेट आहे, असा आरोपही नावेद अली यांनी केलाय. हे आरोपी सौदा करतात. पण, जमीन त्यांच्या नावावर नसते. जमीन विक्रीच्या नावाखाली 18 कोटी रुपयांची फसवणूक माझी केली. या प्रकरणी पाच लोकांवर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. नागपूर पोलिसांच्या आर्थिक शाखेची धाड टाकली.