Flowers Exhibition | नागपुरात रंगीबेरंगी फुलांची बाग फुलली!

| Updated on: Dec 12, 2021 | 3:36 PM

गुलाबी थंडीत नागपूरकरांसाठी एक संधी चालून आली. रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी कासारच्या पठारात जाण्याची गरज नाही. हिस्लाप कॉलेज परिसरात फुलांची प्रदर्शनी भरली आहे. आणखी काही दिवस ही प्रदर्शनी सुरू राहणार आहे.

Flowers Exhibition | नागपुरात रंगीबेरंगी फुलांची बाग फुलली!
हिस्लाप कॉलेजच्या आवारात १८ वी पुष्पप्रदर्शनी भरली आहे. या पुष्पप्रदर्शनीत फुलं पाहताना पुष्पप्रेमी.
Follow us on

नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील हिस्लाप कॉलेजच्या आवारात १८ वी पुष्पप्रदर्शनी भरली. या प्रदर्शनात देशी-विदेशी फुलांच्या रोपट्यांसह रानफुले, हायब्रीड रोपटे तसेच फुलांच्या विविध प्रजाती आहेत. पाहुयात या फुलांची एक झलक.

नागपुरातील पुष्पप्रदर्शनीत झेंडूची वेगवेगळी फुलं न्याहाळताना युवती.

पुष्पप्रदर्शनीत गुलाबाच्या फुलांचा सुगंध घेताना तरुणी.

मनाला शांत करण्यासाठी आपण फुलांकडं बघतो. त्यात नानाविध रंगांची फुलं असली म्हणजे त्याकडे पाहतच राहतो.

फुलांकडं बघीतल्यानं सकारात्मक दृष्टिकोन प्रवहित होतो. या फुलांना खरेदी करून घरी घेऊन जाताना मुली.

ही फुले आपल्या अंगणाला रंगात न्हाऊन टाकतात. अशाच फुलांशी गप्पा करताना युवती.

पुष्प ईश्‍वराच्याच चरणी सर्मपित करण्याची आपली परंपरा आहे. ही फुलांची प्रदर्शनी फुलप्रेमींना मोहून टाकते.