Social media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम

ॲाक्टोबर महिन्यात 20 लाख 69 हजार व्हॅाट्सॲप अकाउंट बंद केल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. त्यामुळं केंद्र सरकारचे नवीन आयटी नियम आलेत. आता सोशल मीडियाचा जपून वापरा, असा सल्ला दिलाय सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी.

Social media बेलगाम मॅसेज आवरा, 20 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाउंट बंद, वाचा नवे आयटी नियम
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 9:02 PM

नागपूर : सोशल मिडियापर सबकुछ चलता है अशा आविर्भावात समाजात द्वेष पसरवणाऱ्यांनी सावध होण्याची वेळ आली आहे. कारण केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांचा स्वीकार करत, व्हॅाट्सॲपने 20 लाखांपेक्षा जास्त अकाउंट बंद केले आहे. केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमानुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला आपला अहवाल सादर करावा लागतो. यानुसार व्हॅाट्सॲपनं नुकताच ॲाक्टोबर महिन्याचा अहवाल सादर केलाय. त्यात ॲाक्टोबर महिन्यात 20 लाख 69 हजार व्हॅाट्सॲप अकाउंट बंद केल्याची माहिती सादर करण्यात आली आहे. त्यामुळं केंद्र सरकारचे नवीन आयटी नियम आलेत. आता सोशल मीडियाचा जपून वापरा, असा सल्ला दिलाय सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांनी.

दर महिन्याला रिपोर्ट सादर करणे आवश्यक

व्हॅाट्सॲपनं 20 लाखांपेक्षा जास्त अकाउंट बंद केले आहे. केंद्र सरकारच्या नवीन आयटी नियमानुसार ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबूक अशा प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला प्रत्येक महिन्याला रिपोर्ट सादर करणे अनिवार्य केले आहेत. यानुसार समाजात द्वेष पसरवण्यासोबतच अश्लील संदेश आणि बदनामी करणाऱ्या अकाउंटवरही नजर ठेवली जाणार आहे. व्हॅाट्सॲपसोबतच इतर समाजमाध्यमंही अशीच कारवाई करणार आहेत. त्यामुळं जातीय द्वेष पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेज सेंट करताना किंवा फॅारवर्ड करताना खबरदारी घ्यायची आहे. नाहीतर तुमचं सोशल मीडिया अकाउंट बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असं आवाहन सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे यांनी केलंय.

वापरकर्त्यांबाबत तक्रार आल्यास कारवाई

द्वेष पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटवर तीन टप्प्यांत कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला नोंदणी करताना तुमचा डेटा तपासला जातोय. त्यानंतर मॅसेज पाठवताना किंवा येणाऱ्या मॅसेजवर वॅाच ठेवला जातोय. आणि तिसरा टप्पा म्हणजे सोशल मीडिया वापरकर्त्यांबाबत तक्रार आल्यास ही कारवाई केली जात असल्यास सायबरतज्ज्ञ अजित पारसे सांगतात.

आयटी कायद्याचं पालन करणं गरजेचं

भारतात व्हॅाट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या 48 कोटी आहे. यापैकी काही जण व्हॅाट्सॲपचा वापर करताना अक्षरशः मोकाट सुटायचे. मनात येईल ते मॅसेज पाठवायचे. यातूनच अमरावती आणि नांदेडसारख्या घटना घडल्यात. पण आता नव्या आयटी कायद्याचं सर्व सोशल मीडिया कंपन्यांना पालन करणं गरजेचं आहे. याची सुरुवात व्हॅाट्सॲपने केलीय. द्वेषमूल मॅसेज पसरवणाऱ्यांचे अकाउंट कायमचे बंद केले. ही वेळ तुमच्यावर येणार नाही. याची दक्षता घेणं गरजेचं आहे.

Nagpur Crime वाढल्या होत्या घरफोड्या, पोलिसांसमोर होतं आव्हान, 3 गँगच्या मुसक्या आवळल्या

Nagpur Crime चोरी करायला आले, मार खाऊन गेले, वाचा कसा घडला थरार!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.