Nagpur traffic | उन्हामुळे नागपुरातील 21 सिग्नल दुपारी बंद; वाहतूक पोलिसांचा निर्णय, कुठे राहणार सिग्नल बंद?

सिग्नलवर थांबावं लागल्यानं उन्हाचा त्रास वाढतो. वाहतूक विभागानं सिग्नलवर न थांबण्याचा हा निर्णय घेतला. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळालाय.

Nagpur traffic | उन्हामुळे नागपुरातील 21 सिग्नल दुपारी बंद; वाहतूक पोलिसांचा निर्णय, कुठे राहणार सिग्नल बंद?
उन्हामुळे नागपुरातील 21 सिग्नल दुपारी बंदImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 12:59 PM

नागपूर : नागपुरात आजपासून पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा (heat waves) इशारा देण्यात आलाय. तापमान 45 च्या वर जाणार आहे. त्यामुळे दुपारी ट्राफिक सिग्नलवर (signals) उभे असलेल्या दुचाकीचालकांना उन्हाचे चटके लागतात. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या उन्हाच्या वेळात नागपुरातील 21 ट्राफिक सिग्नल बंद राहणार आहे. नागपूर ट्राफिक पोलिसांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सिव्हील लाईन्स, (civil lines) सदर, अजनी, बर्डी आणि सोनेगाव परिसरातील सिग्नल दुपारी बंद राहणार आहे. यामुळे नागपूरकरांना मोठा दिलासा मिळालाय. येत्या दोन दिवसांत पुन्हा नागपूरच्या तापमानात वाढ होणाराय. अशावेळी सिग्नलवर थांबल्यास कडक उन्हाचा सामना करावा लागतो.

येथे राहणार दुपारी सिग्नल बंद

सोनेगाव परिमंडळातील काचीपुरा, बाजाजनगर, लक्ष्मीनगर, माता कचेरी येथील सिग्नल दुपारी बंद राहणार. सीताबर्डी परिमंडळातील कन्नमवार चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, लेडीज क्लब चौक, सायन्स कॉलेज चौक, अहिंसा चौक, येथील सिग्नल दुपारी बारा ते चार बंद राहणार आहेत. कॉटन मार्केट परिमंडळातील आग्यारामदेवी चौक, सरदार पटेल चौक, बैद्यनाथ चौक तर, अजनी परिमंडळातील झोन चार ऑफिस आणि नरेंद्र नगर चौकातील सिग्नल दुपारी बंद राहणार आहेत. याशिवाय इंदोरा चौकातील कडबी चौक, दस नंबर पुलिया व भीम चौकातील सिग्नल दुपारी बंद राहील. अशी माहिती नागपूर शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.

नागपूरचे तापमान पुन्हा वाढणार

काल नागपूरचे तापमान 42.4 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलंय. आज सुमारे 43 डिग्री सेल्सिअस तापमान राहणार आहे. उद्यापासून तापमान 44 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. सिग्नलवर थांबावं लागल्यानं उन्हाचा त्रास वाढतो. वाहतूक विभागानं सिग्नलवर न थांबण्याचा हा निर्णय घेतला. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळालाय.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.