Nagpur temperature : नागपुरात उष्माघाताचे 3 बळी? 43 अंंशावर तापमान असलेल्या ठिकाणी आढळले मृतदेह
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात बेशुद्ध अवस्थेत तिघांचे मृतदेह आढळून आले. या तिघांची उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागपूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात बेशुद्ध अवस्थेत तिघांचा मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांचा उष्माघातामुळे (Heatstroke) मृत्यू (Death) झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कपिल नगर, जुनी कामठी आणि देवलापार परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती आहे. तिन्ही प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नागपुरात (Nagpur) दुपारचे चटके असह्य होत असून मंगळवारी 43 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हे तीन मृत्यू उष्माघाताने तर नाही ना, अशी चर्चा नागपुरकरांमध्ये आहे. नागरिकांनी उन्हात दुपारी 12 ते 4 या वेळेत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा अशा सूचना हवामान विभागाने दिल्यायेत. नागपूर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीचा ठिकाणी आधार घ्यावा, आवश्यक असेल तरच संपूर्ण काळजी घेत घराबाहेर पडावे असे आवाहन केलंय.
तापमान वाढण्याची शक्यता
नागपूर जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकतो असा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तवलाय. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. चंद्रपूरचे तापमान देखील 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. उष्णता वाढत असल्याने नागरिक घरीच बसण्यास प्राधान्य देत असून, काही अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडताना दिसत आहेत. नागपूरप्रमाणेच मराठवाड्यात देखील सुर्य आग ओकत आहे. मराठवाड्याच्या तापमाना देखील मोठी वाढ झाली आहे. एकीकडे राज्यातील तापमान वाढत आहे, तर दुसरीकडे काही भागात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.
शक्यतोवर घराबाहेर पडू नये
दरम्यान, हे तीन मृत्यू उष्माघाताने तर नाही ना, अशी चर्चा नागपुरकरांमध्ये आहे. नागरिकांनी उन्हात दुपारी 12 ते 4 या वेळेत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा अशा सूचना हवामान विभागाने दिल्यायेत. नागपूर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीचा ठिकाणी आधार घ्यावा, आवश्यक असेल तरच संपूर्ण काळजी घेत घराबाहेर पडावे असे आवाहन केलंय. नागपूरमध्ये तापमान 44 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. पुढील पाच दिवसांत विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णता राहणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस काही ठिकाणी हीट व्हेवची परिस्थिती असणार आहे. आता वाढत असलेले तापमान पाहून वाटत आहे की वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि नागपूर या ठिकाणी तापमान वाढून हीट व्हेवची परिस्थिती निर्माण होणार आहे,” अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांनी दिली आहे.