6 पैकी 5 पंचायत समितींवर महाविकास आघाडीचा झेंडा, तर मानोरा पंचायत समिती कुणाकडं?
आजच्या पंचायत समिती निवडणुकीत मालेगाव आणि रिसोड पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालं.
विठ्ठल देशमुख/गजानन उमाटे, Tv9 प्रतिनिधी वाशिम/नागपूर : वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपिर, मानोरा आणि मालेगाव या 6 पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. कारंजा पंचायत समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख यांनी बिनविरोध तर उपसभापती पदी वंचितच्या अलका अंबरकर यांची निवड झाली. रिसोड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केशरबाई हाडे तर उपसभापती पदी बाळासाहेब ठाकरे गटाच्या (शिंदे गट) सुवर्णा नरवाडे यांची निवड झाली आहे.
वाशिम पंचायत समिती सभापती म्हणून सावित्रीबाई वानखेडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ) यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसचे गजानन गोटे यांची नियुक्ती झाली आहे. मंगरुळपिर पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा भगत यांची तर उपसभापतीपदी उषा राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मानोरा पंचायत समिती सभापतीपदी भाजपाच्या सुजाता जाधव तर उपसभापतीपदी मेघा राठोड यांची निवड झाली आहे. मालेगाव पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या रंजना काळे यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या निर्मला जाधव यांची निवड झाली आहे.
आजच्या पंचायत समिती निवडणुकीत मालेगाव आणि रिसोड पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालं. मालेगाव व रिसोड पंचायत समित्यांमधील जनविकास आघाडीची सत्ता खेचून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम
आज झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये काटोल व नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती विजय झालेत. नरखेड पंचायत समितीमध्ये महेंद्र गजबे हे सभापतीपदी बिनविरोध तर उपसभापतीपदी माया प्रवीण मुढोरिया विजयी झालेत.
काटोल पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय डांगोरे हे सभापती तर उपसभापतीपदी निशिकांत नागमोते हे बिनविरोध निवडून आले आहेत. काटोल नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम आहे.