क्रेन आणल्यावरही झाड उचललं जात नव्हतं, आक्रोश थांबता थांबत नव्हता; अकोल्यात नेमकं काय घडलं?

पावणे आठ वाजता खूप मोठं वारं उधाण आलं. पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पावसाचा सहारा घेत काही भाविक टिनाच्या शेडमध्ये गेले. त्यावेळी 100 वर्ष जुनं झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सातजण ठार झाले.

क्रेन आणल्यावरही झाड उचललं जात नव्हतं, आक्रोश थांबता थांबत नव्हता; अकोल्यात नेमकं काय घडलं?
Akola Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 7:23 AM

अकोला : बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच वादळी वारा आल्यामुळे बाजूच्या टिनशेडमध्ये आसऱ्याला आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. या टिनशेडच्या बाजूलाच असलेलं 100 वर्ष जुनं कडुलिंबाचं झाड कोसळल्याने सातजणांचा मृत्यू झाला. तर 40 जण जखमी झाले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे पारस गावात एकच आक्रोश सुरू झाला. अनेकजण झाड अंगावर पडल्याने विव्हळत होते. तर आपल्या नातेवाईकांचे मृतदेह पाहून अनेकांनी हंबरडा फोडला. अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. गावकऱ्यांचा आक्रोश थांबता थांबत नव्हता. मंदिर परिसरापासून ते रुग्णालयापर्यंत रडारड सुरू झाली होती. जो तो सुन्न झाला होता.

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थांच्या टिन शेडवर कडूलिंबाचं झाड कोसळल्याने 40 गावकरी त्याखाली दबले गेले. या घटनेतील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले असून या दुर्घटनेत आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. 40 जण जखमी झाले. त्यापैकी काहींना सोडून देण्यात आले असून 29 जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

झाड कोसळल्यानंतर गावकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. जो तो जीवमुठीत घेऊन पळू लागला. तर काही लोक झाड आणि टिनाच्या शेडखाली दबल्याने विव्हळत होते. रात्रीचा अंधार असल्याने काहीच कळत नव्हतं. सर्वत्र आक्रोश सुरू होता. स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोबाईलचे टॉर्च सुरू करत झाडाखाली दबलेल्यांचा शोध घेतला. या जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गावातील तरुण मुलांनी रात्रभर जागून मदत कार्य केलं.

अशी घटना पाहिली नाही

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मदत कार्याला सुरुवात केली. ही घटना अत्यंत भीषण असल्याचं त्यांनी सांगितलं. पावणे आठचा टाईम होता. आज रविवारचा दिवस होता. रविवारी जिल्ह्यातील सर्व भाविक इथे जमा होत असतात. त्याप्रमाणे आजही भाविक आरतीसाठी आले होते. संध्याकाळी सर्व भाविक इथे जमत असतात. मुक्काम करत असतात. पावणे आठ वाजता खूप मोठं वारं उधाण आलं. पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पावसाचा सहारा घेत काही भाविक टिनाच्या शेडमध्ये गेले.

अचानक वारा आल्यामुळे 100 वर्ष जुनं कडुलिंबाचं झाड कोसळलं. झाड एवढं मोठं होतं की क्रेन आणल्यावरही झाडं उचललं जात नव्हतं. माझ्या आयुष्यात मी अशी घटना पाहिली नाही. ही सर्वात मोठी दुर्देवी घटना घडली. इथली स्थिती पाहून काय बोलावं हेच कळत नव्हते. स्थानिक लोक, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी ताबडतोब आले. त्यांनी मदत कार्यही सुरू केलं, असं आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं.

फडणवीस यांच्या सूचना

अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दखल घेत जिल्हा प्रशासन आणि विद्युत विभाग तसेच महसूल विभाग आरोग्य विभागाला तात्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या. तसेच अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना संपर्क करून त्यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच भारतीय भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही या घटनेची माहिती घेतली.

आर्थिक मदत देणार

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी घेतला आहे, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.