Vidarbha Temperature | 11 पैकी 7 दिवस देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर, अकोल्यात; विदर्भात 11 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा

सध्या देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भत होतेय. अकोला आणि चंद्रपूर ही शहर देशात तापमानात टॉपवर आहेत. 11 एप्रिलपर्यंत उष्णतेची लहर कायम राहणार आहे. पुढील आठवड्यात विदर्भातील तापमानात वाढ अपेक्षित आहे.

Vidarbha Temperature | 11 पैकी 7 दिवस देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर, अकोल्यात; विदर्भात 11 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा
विदर्भातील तापमान देशात सर्वाधिक.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:18 AM

नागपूर : गेल्या अकरा दिवसांपैकी सात दिवस चंद्रपूर आणि अकोला (Chandrapur, Akola) देशातील सर्वाधिक तापमान असलेली ठिकाणं ठरली. 43 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास तापमान या दोन शहरांमध्ये नोंदविण्यात आलंय. गुजरात आणि राजस्थानमधून (Gujarat and Rajasthan) येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळं तापमान वाढल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. 11 एप्रिलपर्यंत ही उष्णतेची लहर विदर्भात कायम राहणार आहे. विदर्भात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा (Heat waves) येत आहेत. तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटांची संख्या वाढली. गेल्या पाच दशकांमध्ये नागपूर उष्णतेच्या लाटेत पहिल्या नंबरवर आलाय. उष्णतेच्या लाटेत चंद्रपूर दुसऱ्या तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भत होतेय. अकोला आणि चंद्रपूर ही शहर देशात तापमानात टॉपवर आहेत. 11 एप्रिलपर्यंत उष्णतेची लहर कायम राहणार आहे. पुढील आठवड्यात विदर्भातील तापमानात वाढ अपेक्षित आहे.

अकोला @ 44.1

नागपुरात मार्च वगळता एप्रिल, मे, जून आणि जुलैत मागच्या पाच दशकातील सर्वाधिक उष्णतेच्या लाटांची नोंद झालीय. नागपूरमध्ये 1969 ते 2019 दरम्यान उन्हाळ्यात सर्वाधिक 246 उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. चंद्रपूर शहरात 179 तर अमरावती शहरात 169 उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. तापमानाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहणारे अकोला पुन्हा आता चर्चेत आलंय. अकोला जगातील सर्वाधिक हॉट शहर ठरलंय. अकोल्यात देशात सर्वाधिक म्हणजेच 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. या तापमानामुळे जनजीवन प्रभावित होतंय. या उन्हामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

विदर्भात असा राहणार पुढील आठवडा

अकोल्यात कालचं तापमान 43 डिग्री सेल्सिअस होतं. 11 ते 14 एप्रिलच्या दरम्यान हे तापमान 44 ते 45 अंश डिग्री सेल्सिअसवर जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. चंद्रपुरात कालचं सर्वाधिक तापमान 42 डिग्री सेल्सिअस होतं. 12 ते 14 एप्रिलच्या दरम्यान या तापमानातही वाढ होईल. 43 ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. नागपूरचा विचार केल्यास काल 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं होतं. त्यात पुढील आठवड्यात वाढ होणार आहे. 11 ते 14 एप्रिलदरम्यान नागपुरातलं तापमान 42 ते 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचणार आहे.

Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.