AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौरीशंकर जंगलात शेळ्यांसाठी चारा आणायला गेला; रात्री उशिरापर्यंत परतला नसल्याने कुटुंबीय चिंतित

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही घटना घडली. पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चारगाव बीटमध्ये ही घटना घडली. प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली. देवलापार पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

गौरीशंकर जंगलात शेळ्यांसाठी चारा आणायला गेला; रात्री उशिरापर्यंत परतला नसल्याने कुटुंबीय चिंतित
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:37 AM

नागपूर : गौरीशंकर नावाचा तरुण मौदी गावात राहतो. गावाला लागून जंगल असल्याने तो जंगलात बकऱ्यांसाठी चारा आणायला गेला होता. पण, तो घरी परतला नाही. त्यामुळे घरचे लोकं चिंतित पडले. उशिरापर्यंत रात्री घरी आला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी धक्कादायक घटना समोर आली. जंगलात वाघाचा वावर असल्याने भीती व्यक्त करण्यात आली. आता वाघाने हल्ला केलेल्या भागात गस्त वाढवण्यात आली आहे. जलद बचाव दल, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान, वनकर्मचारी आणि प्राथमिक बचाव पथकातील सदस्यांना तैनात करण्यात आले आहे. या जंगलात येणे-जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

वाघाचा युवकावर हल्ला

जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात वाघाच्या हल्लात 29 वर्षीय युवक ठार झालाय. पवनी राखीव वनपरिक्षेत्रातील मौदी जंगलात वाघाने युवकांवर हल्ला केला. यात युवकाचा मुत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. गुरुवारी सकाळी 7 वाजता मौदी या आपल्या गावालगतच्या वनविभाग राखीव जंगलात मौदी येथील गौरीशंकर श्रीभद्रे गेला होता.

हे सुद्धा वाचा

बकऱ्यांना चारा आणायला गेला तो शेवटचाच

बकर्‍यांच्या चारा झाडांचा पाला आणण्याकरिता जंगलात गेलेल्या 29 वर्षीय गौरीशंकरवर वाघाने हल्ल्ला केला. बराच वेळपर्यंत तो घरी न आल्याने घरील लोकांनी गौरीशंकरची शोधाशोध केली. तो जंगलात मृतावस्थेत आढळला. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परिसरात वाघाचे पायाचे मार्क दिसले. मृतकावरील जखमा या वाघाने केल्याचे निष्पन्न झाले.

५० हजारांचा धनादेश मृतकाच्या पत्नीला दिला

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही घटना घडली. पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चारगाव बीटमध्ये ही घटना घडली. प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली. देवलापार पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. गौरीशंकरची पत्नी वंदना हिला ५० हजारांचा धनादेश त्वरित देण्यात आला.

अशी करण्यात येणार कार्यवाही

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प क्षेत्रसंचालक ए. लक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्या सूचनेवरून मृतकाच्या वारसाला २० लाख रुपये मदत मंजुरीची कार्यवाही करण्यात येत असल्याचे वनक्षेत्रपाल जयेश तायडे यांनी सांगितलं.

५० हजार रुपयांचा धनादेश देताना वनक्षेत्रपाल जयेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरकुटे, पूर्व पेंचचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे, रामटेक पंचायत समितीचे सभापती संजय नेवारे, पवनीचे सरपंच डॉ.सुधीर नाखले उपस्थित होते.

हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.