विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न, पोलीस आयुक्तांनी घेतला प्राचार्यांचा क्लास

नागपूर शहरात शाळेत जाण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, ऑटो यांचा वापर केला जातो. परंतु, या वाहनांचे काही चालक नियमांचे पालन करत नाहीत. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते.

विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न, पोलीस आयुक्तांनी घेतला प्राचार्यांचा क्लास
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 4:15 PM

नागपूर : नागपुरात विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळेच नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्राचार्यांचा क्लास घेतला. अमितेश कुमार यांनी प्राचार्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात. नागपुरात बऱ्याच शाळांमध्ये स्कुलबस, स्कुल व्हॅन आणि ॲाटोरिक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरशा कोंबून भरलं जातं. यामुळे अपघाताची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुलांना रस्ता सुरक्षेचे धडे द्यावे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. अशा सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्यात.

कारवाईची धडक मोहीम घेणार

नियमांचं पालन झालं नाही, तर लवकरंच नागपूर पोलीस नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या स्कुलबस, स्कुल व्हॅन आणि ॲाटोरिक्षावर कारवाईची धडक मोहीम हाती घेणार आहेत, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

पोलीस आयुक्तांनी घेतला पुढाकार

नागपूर शहरात शाळेत जाण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, ऑटो यांचा वापर केला जातो. परंतु, या वाहनांचे काही चालक नियमांचे पालन करत नाहीत. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते. यामुळे अपघाताची शक्यता वाढते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला.

कारवाईचा इशारा देण्यात आला

नियमानुसार वाहतूक केली पाहिजे, असा आग्रह पोलीस आयुक्तांनी केला. यासाठी त्यांनी नागपूर शहरातील महत्त्वाच्या शाळांच्या प्राचार्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. या सूचनांचे पालन केले गेले नाही. तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

विद्यार्थी शाळेत जात असताना सुरक्षित घरी आले पाहिजे. अशी पालकांची अपेक्षा असते. विद्यार्थ्यांना घरी येण्यास उशीर झाल्यास पालकांच्या ह्रदयाचा ठोका चुकचुकतो. आपला पाल्य सुरक्षित घरी यावा, अशी त्यांनी अपेक्षा असते.

परंतु, काही वाहन चालक गैरजबाबदारीने वाहन चालवतात. त्यामुळे काही ठिकाणी अपघात होतात. अशा घटना घडू नये, यासाठी आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना सांभाळून चालवावे लागणार आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.