वडिलांसोबत मुलगी रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी आली, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते

रेल्वे पोलिसांना कळवलं. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला. त्यानंतर त्यांना एक आरोपी मुलीला घेऊन जात असल्याचं लक्षात आलं.

वडिलांसोबत मुलगी रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी आली, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 4:48 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नागपूर : वडील कुठं थोड्या वेळासाठी बाहेर जात असतील तर ते बहुधा लहान मुलांना सोबत घेऊन जातात. एक वडील मुलीला घेऊन नागपूर रेल्वे स्थानकावर गेले. तिथं ते तिकीट खरेदी करत होते. तेवढ्यात सोबत असलेली मुलगी त्यांना दिसली नाही. त्यामुळे वडिलांना धक्काच बसला. आताच सोबत होती. मुलगी गेली कुठं म्हणून त्यांनी शोधाशोध सुरू केली. रेल्वे पोलिसांना कळवलं. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला. त्यानंतर त्यांना एक आरोपी मुलीला घेऊन जात असल्याचं लक्षात आलं. रेल्वे पोलिसांना मुलीचा शोध सुरू केला.

चोरट्याने मुलीला सोबत घेऊन काढला पळ

नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकावर वडिलांसोबत तिकीट काढायला आलेल्या लहान मुलीचं अपहरण करण्यात आले. वडिलांची नजर चुकवून चोरट्याने मुलीला सोबत घेऊन पळ काढला. वडिलाच्या बाजूला मुलगी नसल्याचं लक्षात येताच शोधाशोध सुरू झाली. रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सीसीटीव्हीचा आधार घेत शोध सुरू केला.

हे सुद्धा वाचा

आरोपी मुलीला घेऊन बाहेर राज्यात जाण्याच्या तयारीत

आरोपी मुख्य रेल्वे स्थानकावर गेल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मुख्यस्थांनकवर शोध सुरू केला. एक आरोपी मुलीला घेऊन येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास येताच आरोपीला अटक केली. आरोपी बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता. मुलीला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निःस्वास सोडला.

लहान मुलांची घ्या काळजी

लहान मुलांना कुठंही बाहेर घेऊन जात असाल, तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कोण कशाचं आमिष देऊन मुलांना सोबत घेऊन जाईल काही सांगता येत नाही. समाजात काही समाजकंटक असतात. अशा समाजकंटकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. लहान मुलांना आमिष दाखवल्यास ते बळी पडतात. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाचे दिवस असल्याने दुपारी शक्यतो लहान मुलांना घराबाहेर घेऊन जाऊ नये. लहान मुलं हट्ट करत असतात. अशावेळी त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.