नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील नांदागोमुख नाल्यावरून काल चालकांच्या अति आत्मविश्वासाने स्कार्पिओ कार पुलावरील पाण्यातून वाहून गेल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडलीयं. या कारमध्ये एकून 6 जण होते आणि साहीजण वाहून गेले. त्यापैकी काल तिघांचे मृतदेह काढण्यात यश आले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे. यामुळे नदी आणि नाले ओसांडून वाहत आहेत. मात्र, पुराच्या पाण्यातून वाट काढत जाण्याची घाई 6 जणांच्या जीवावर बेतली आहे.
नागपूर येथील नांदागोमुख गावाजवळ पुरातील पाण्यातून वाट काढताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यानंतर ही काही वाहन चालक पुरातून वाहन काढण्याचे धाडस करताना दिसले आहेत.
सहा जण वाहून गेले त्यापैकी तिघांचे मृतदेह काल मिळाले होते. रात्री अंधार पडल्यामुळे काल रेस्क्यू ऑपरेशन थांबविण्यात आलं होतं. आज सकाळपासून एसडीआरफ आणि स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवत आणखी दोन मृतदेह शोधून काढण्यात यश मिळालं.
मौदा तालुक्यातील तारसा गावाजवळून वाहणाऱ्या सांड नदीचा पुलावर पाणी वाहत असून पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून जिवावर उदार होऊन काही बाईकस्वार पुराच्या पाण्यातून वाहने चालवत आहेत.