Video – Nagpur crime | दुकानात येऊन घातला धुडगूस, नागपुरात तोडफोड करताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नागपुरात पुन्हा एक खंडणीचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय. दुकानात जाऊन खंडणी न मिळाल्यानं त्यांनी तोडफोड केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

Video - Nagpur crime | दुकानात येऊन घातला धुडगूस, नागपुरात तोडफोड करताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली.
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 2:12 PM

नागपूर : शहरात बिल्डर प्रफुल्ल गाडगे यांना पाच कोटींची खंडणी (Ransom) मागण्यात आली. त्यांनी नकार दिल्याने परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. ही चर्चा सुरूच असताना आता दुसरा एक खंडणीचा प्रकार समोर आला. ही खंडणी ग्रामीण भागातील आरोपींनी मागितली. सीसीटीव्हीबद्दल कदाचित त्यांना माहीत नसावे. त्यामुळं दुकानाची तोडफोड (vandalized the shop) करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळं दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यशआलंय. पहिल्या प्रकरणातील आरोपी कोण आहे. याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. कारण त्याने फक्त फोनवरून धमकी दिली होती. आणि लकडगंजमधील प्रकरणात आरोपी खुलेआम दुकानाद येऊन धमकी देत होते. नागपूरच्या लकडगंज पोलीस (Lakdaganj police ) स्टेशन हद्दीतील एका दुकानात खंडणीसाठी शस्त्र घेऊन तोडफोड केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींवर या आधीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत.

खंडणी देण्यास दुकानदाराचा नकार

लकडगंज परिसरातील वर्धमाननगर चौकात एक दुकान आहे. या दुकानात दोन ते तीन आरोपी आले. त्यांनी दुकानदाराला 10 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला व्यवसाय करता येणार नाही, असं धमकावलं. मात्र, दुकानदाराने खंडणी देण्यास नकार दिला. आरोपी निघून गेले. मात्र थोड्या वेळात हातात शस्त्र घेऊन परत आले. आरोपींनी दुकानात तोडफोड केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

पाहा व्हिडीओ

आरोपी ग्रामीण भागातील

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर एकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती लकडगंडचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी दिली. आरोपी हे ग्रामीण भागातील राहणारे आहेत. त्यांना आपली दहशत पसरवली. हप्ता वसुली करायची होती. मात्र पोलिसांनी त्यांना आता त्याची जागा दाखविली. दहशत माजविण्याचा हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी सुद्धा कडक कारवाई केली आहे.

Gold Price Today : सोन्याची अस्मानी झेप, वर्षातील सर्वाधिक भावाची नोंद; महिनाभर तरी कडक राहणार, कारण…

नागपूरहून शिर्डीला थेट विमान, शुक्रवारपासून फ्लाईट होणार सुरू, तासाभरात घेता येणार साईबाबांचे दर्शन

Nagpur Crime | पाच कोटी भेज दे नहीं तो उठा लुंगाँ, प्रफुल्ल गाडगे यांना दिलेल्या अपहरणाच्या धमकीने नागपुरात खळबळ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.