Nagpur | मेडिकलच्या अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. राज गजभिये यांच्याकडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व्हेंटिलेटरवर

नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) चे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता (Dean Dr. Sudhir Gupta) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. ते सध्या व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. त्यामुळं वैद्यकीय शिक्षण विभागाने मंगळवारी अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी मेडिकलच्या शल्यक्रियागृह विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांच्याकडे सोपवली.

Nagpur | मेडिकलच्या अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. राज गजभिये यांच्याकडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व्हेंटिलेटरवर
नागपुरातील मेडिकलची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आलेले डॉ. राज गजभिये.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 3:45 PM

नागपूर : मेडिकलचे माजी अधीष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर पदोन्नतीने सुपर स्पेशालिटी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे मेडिकलच्या अधिष्ठाता पदाची जबाबदारी देण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच डॉ. सुधीर गुप्ता (Dean Dr. Sudhir Gupta) यांना मेडिकलमध्येच विभागीय पदोन्नतीने अधिष्ठातादावर कायम नियुक्ती देण्यात आली. डॉ. गुप्ता मेडिकलमध्ये कार्यरत आहेत. डॉ. गुप्ता यांनी येथील बालरुग्णांसाठी स्वतंत्र कोविड वॉर्डला गती दिली. हवेतून प्राणवायू तयार करणारे प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात झाले. मेडिकलसह सुपर स्पेशालिटीत पदव्यूत्तरच्या जागा वाढीच्या प्रकल्पांना गती त्यांनी दिली. बहुतांश कामही पूर्ण झाले आहेत. दीड महिन्याभरापूर्वी डॉ. गुप्ता यांची प्रकृती खालाविली. गत आठवड्यात त्यांची प्रकृती आणखीनच खालाविली. ते सध्या व्हेंटिलेटरवर उपचार (treatment on ventilator) घेत आहेत. त्यामुळं डॉ. राज गजभिये (Additional Responsibility Raj Gajbhiye) यांच्याकडे मेडिकलच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ट्राम रुग्णांसाठी पुन्हा सुरू

अपघाती जखमींकरिता मेडिकल येथील ट्रॉमा केअर सेंटरसह मेयो येथील सजिर्कल कॉम्प्लेक्समध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते. परंतु तिसर्‍या लाटेमध्ये हे दोन्ही शोभेची वस्तू ठरत होते. परंतु आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. ट्रॉमा आणि सर्जिकल कॉम्प्लेक्स रुग्णांकरिता पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

परिस्थिती पाहून निर्णय

कोरोनाचा धोका लक्षात घेत ट्रॉमा केअर युनिट बंद ठेवले होते. बावीस कोटी रुपये खर्चून तयार झालेले ट्रॉमा युनिट तिसर्‍या लाटेच्या प्रतीक्षेत होते. आता तिसर्‍या लाटेचा धोका टळल्याचे चित्र आहे. गरजेनुसार, ट्रॉमा युनिटमध्ये अपघातामध्ये गंभीर जखमी रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयीन परिस्थिती बघून निर्णय घेण्यात आल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितलं.

एका चुकीची शिक्षा 18 लाख गरिबांना?, नागपुरात वेळेत उचल न केल्याने जानेवारीचे मोफत रेशन नाही

नागपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

नागपूरमध्ये एरो मॉडेलिंग शोचा थरार पाहता येणार! क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...