अजित पवार VS चंद्रशेखर बावनकुळे, करेक्ट कार्यक्रम कुणाचा होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!
अजित पवारांनी जसं आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंना दिलंय. तसंच आव्हान 2019 साली विजय शिवतारेंना दिलं होतं. आणि ते पूर्णही केलं होतं.
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामतीत घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करणार असं चॅलेंज दिलं होतं. त्याला आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिआव्हान दिलंय. बावनकुळेंचाच करेक्ट कार्यक्रम करु शकतो असं अजित पवारांनी म्हटलंय. “हाताचा पंजा थांबवणार, मशाल विझवणार, आणि घड्याळ बंद पाडणार”, अशा घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केल्या होत्या. बावनकुळेंनी मिशन बारामतीची घोषणा आधीच केलीय. पण याच घोषणेवरुन काल अजित पवारांनी बावनकुळेंना चांगलंच धारेवर धरलं. अजित पवारांनी बावनकुळेंनाच करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला.
अजित पवारांनी जसं आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंना दिलंय. तसंच आव्हान 2019 साली विजय शिवतारेंना दिलं होतं. आणि ते पूर्णही केलं होतं.
अजित पवारांनी आव्हान दिलंय. आणि ते बावनकुळेंनीही स्वीकारलंय.
त्यामुळं 2024 साली कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे पाहावं लागेल.