AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात अजित पवार यांच्यासाठी प्रशस्त बंगला; अजित पवार यांचा मुक्काम अनिल देशमुख यांच्या शेजारी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलीस उपायुक्तांचा बंगला देण्यात येणार आहे. तशी प्रक्रिया नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू झाली आहे.

नागपुरात अजित पवार यांच्यासाठी प्रशस्त बंगला; अजित पवार यांचा मुक्काम अनिल देशमुख यांच्या शेजारी!
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 4:02 PM

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागपुरातील मुक्काम अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानाशेजारी असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून नागपुरातील सहपोलीस आयुक्तांचा बंगला अजित पवार यांना देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा एकमत झालंय. याबाबतचा प्रस्ताव पाठवल्याचा माहिती आहे. PWD चा ३१/१ हा बंगला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. पण उपराजधानीत उपमुख्यमंत्र्यासाठी देवगिरी हा एकच बंगला आहे. सध्या देवगिरी हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलाय. त्यामुळे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील सहपोलीस आयुक्तांचा बंगला देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकमत झालंय.

तात्पुरती व्यवस्था बंगला नंबर सहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलीस उपायुक्तांचा बंगला देण्यात येणार आहे. तशी प्रक्रिया नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू झाली आहे. तो बंगला तयार होईपर्यंत रवीभवन परिसरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. बंगला नंबर सहामध्ये अजित पवार यांचा तात्पुरता मुक्काम असेल. अजित पवार उपमुख्यमंत्री अशी नेमप्लेटही लागली आहे.

पोलीस उपायुक्तांचा बंगला देण्याची तयारी

सध्या महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. नागपुरात उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हा एकच बंगला आहे. नव्याने शपथ घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोरील पोलीस उपायुक्तांचा बंगला देण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे. त्या बंगल्याचे काम होईपर्यंत रविभवन परिसरातील तात्पुरता बंगला अजित पवार यांना देण्यात येणार आहे.

अनिल देशमुख यांचे शेजारी होणार

अजित पवार यांचे नागपूर किंवा विदर्भात दौरे असल्यास ते रविभवन परिसरातील बंगल्यात राहणार आहेत. ही तात्पुरती व्यवस्था आहे. विरोधी पक्षनेते असताना अजित पवार हे याच बंगल्यात थांबायचे. आता उपमुख्यमंत्री झाल्याने नियमित बंगला हा पोलीस उपायुक्तांचा बंगला मिळणार आहे. हा बंगला अनिल देशमुख यांच्या खासगी निवासस्थानाजवळ आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर तो बंगला आहे. तो बंगला अजित पवार यांना देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे एकमत झालं आहे. तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून रवीभवन परिसरातील बंगला नंबर सहा अजित पवार यांच्यासाठी देण्यात आला आहे.

भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO
अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन घरावर, काचा फुटल्या तर कुठ आग लागली, बघा VIDEO.
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार...
पाकच पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार....
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी तबाहीची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.