शिंदे-फडणवीस सरकारच्या घोटाळ्याचा 7/12 चा विरोधकांनी मांडला; अब्दुल सत्तार यांच्याबरोबरच ‘या’ मंत्र्यांचाही आहे घोटाळ्यात समावेश…
शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबरोबरच आता उदय सामंत आणि संजय राठोड यांची नावं घोटाळ्या प्रकरणी पुढं आली आहेत. त्यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासून विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्यावर सरकारला घेरण्यासाठी तयारी केली होती. विरोधकांच्या पहिला मुद्दा हा सीमाप्रश्नी सरकारने ठराव पास करावा आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना न्यया मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. वाशिम येथील गायरान जमीनाचा प्रश्न उपस्थित करून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग असल्याचे सांगत त्यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
तर आता वाशिममधील गायरान जमिनीबरोबरच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी रत्नागिरी, संभाजीनगर मार्केट कमिटीतही कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.
त्यांच्या वेगवेगळ्या केलेल्या घोटाळ्यामुळे विरोधकांकडून दोन्ही सभागृहात आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही अंबादास दानवे यांनी सांगितले. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्रमक होत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह उदय सामंत यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळ्यावरून राजीनाम्याची मागणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. अंबादास दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप करताना त्यांनी सांगितले की, मंत्री सत्तार यांनी हा काही पहिलाच घोटाळा केला आहे असे नाही तर याही अगोदर त्यांनी रत्नागिरी, संभाजीनगर मार्केट कमिटीतही घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मेगाप्रोजेक्टच्या नावाखाली मंत्री अब्दुल सत्तार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 250 कोटीचा एकच प्रोजेक्ट चिपळूण आणि श्रीरामपूरमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या मेगाप्रोजेक्टच्या नावाखाली या सरकारने नियमाला हरताळ त्यांनी फासलेला आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांची आम्ही दोन्ही सभागृहात राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिल्लोड मतदार संघात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमामध्ये अब्दुल सत्तार यांनी कंपन्यांचे मालक, खतविक्री कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे कार्यक्रमवर पत्रिकेवर त्यांचे फोटो छापून त्यांनी त्यांना कामाला लावण्याचे काम केले आहे. त्यातून वेगवेगळ्या कार्डची निर्मिती करून त्यांनी वेगवेगळ्या ती वेगवेगळ्या किंमती ठेऊन त्यांचीही विक्री केली जाते आहे.
त्यामुळे या अब्दुल सत्तार, उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्यासह अधिकाऱ्यांवरही हक्कभंग आणणाल असा इशारा अबांदास दानवे यांनी दिला आहे.