बहिणीच्या अपहरणाची धमकी, ९ वर्षांच्या मुलाला केले टार्गेट; अशी उकळली रक्कम

धमक्यांमुळे लहान मुलगा घाबरला होता. आठ वेळा त्याने आरोपींना पैसे ट्रान्सफर केले. शनिवारी त्याच्या तब्यत बिघडल्याने तो रडायला लागला.

बहिणीच्या अपहरणाची धमकी, ९ वर्षांच्या मुलाला केले टार्गेट; अशी उकळली रक्कम
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 11:40 AM

नागपूर : अल्फिया नदीम शेख या युट्युबर आहेत. नऊ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी आहे. त्यांचा मुलगा कधीकधी मोबाईलवर फ्री फायर ह गेम खेळतो. मार्चमध्ये एस. के. भाईजान, प्रमोद कालू , अधद आणि दीपक बोरा हे जॉईन झाले. त्यांनी या मुलाशी चॅटिंग केली. त्याच्याकडून गूगल पेचा पिन पाठवण्यास सांगितले. तुझ्या बहिणीचे अपहरण करू अशी धमकी दिली. मुलाला पैसे कसे ट्रान्सफर करायचे हे सांगितले. त्याने भीतीपोटी आईच्या मोबाईलवरून २० मार्च ते सहा एप्रिल दरम्यान १ लाख दोन हजार रुपये ट्रान्सफर केले.

मुलगा ऑनलाईन गेम खेळत होता

लहान बहिणीसह अपहरण करण्याची धमकी देत नऊ वर्षीय मुलाकडून सायबर गुन्हेगारांनी एक लाख रुपये उकळले. गुन्हेगारांनी नागपुरातील महिला युट्युबरच्या मुलाला टार्गेट केलं. मुलगा ऑनलाईन गेम खेळत असताना त्याची आरोपीसोबत ओळख झाली होती.

हे सुद्धा वाचा

आरोपींना पाठवले पैसे

अपहरणाची धमकी दिल्याने 9 वर्षाच्या मुलाने आईच्या मोबाईलमधून आरोपींना वेगवेगळ्या वेळी पैसे पाठविले. कोराडी पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्फियाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला.

काही मुलं ऑनलाईन गेमवर पैसे खर्च करतात. ई-कॉमर्सच्या मार्केटिंगची भुरळ त्यांना पडते. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता असते म्हणून पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देताना बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

धमक्यांमुळे मुलगा घाबरत होता

धमक्यांमुळे लहान मुलगा घाबरला होता. आठ वेळा त्याने आरोपींना पैसे ट्रान्सफर केले. शनिवारी त्याच्या तब्यत बिघडल्याने तो रडायला लागला. अल्फियाने त्याला विश्वासात घेऊ विचारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रमोद कालू याच्या खात्यात सर्व रक्कम वळती झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आरोपी एक की तीन हे तपासानंतरच स्पष्ट होईल.

या प्रकारामुळे पालकांना सावध राहणे गरजेचे झाले आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या करून पैसे उकळण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे चांगल्या माणसांना नाहक त्रास होतो. घाम गाळून कमवलेले पैसे असे हवेत उडाल्याचे पाहून दुःख होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.