Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime | 18 वर्षीय विद्यार्थिनी शिकवणीला जात होती; नागपुरात मनोरुग्णानं मारला डोक्यावर हातोडा

मेडिकल चौकात विद्यार्थिनी शिकवणीला जात होती. पायऱ्या चढत असताना एक मनोरुग्ण तिथं आला. त्यानं तिच्या डोक्यावर हातोडा मारला. ती जोरानं ओरडली. आजूबाजूचे तिच्या मदतीला धावले. मनोरुग्णाला बाजूला केलं. पोलिसांनी मनोरुग्णाच्या पालकांना बोलावून त्याला त्यांच्या स्वाधीन केलं.

Nagpur Crime | 18 वर्षीय विद्यार्थिनी शिकवणीला जात होती; नागपुरात मनोरुग्णानं मारला डोक्यावर हातोडा
नागपुरात मनोरुग्णानं मारला डोक्यावर हातोडा Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 12:13 PM

नागपूर : 18 वर्षीय विद्यार्थिनी मेडिकल (Medical) चौकातील एटलांटा कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणी वर्गात (Teaching) दाखल होत होती. एवढ्यात जीन्यावर असताना मनोरुग्णाने मागून येऊन तिच्या डोक्यावर घाव घातला. सुदैवाने ती इन्स्टिट्यूटच्या पायऱ्या चढत असल्याने घाव जोरात लागला नाही. त्यामुळे तिला फार गंभीर इजा झाली नाही. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून इन्स्टिट्यूटसह शेजारचे लोक तिच्या मदतीसाठी धावले. त्यामुळेच आरोपी दुसरा वार करू शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असता तो मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं. त्याला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. तपास अजनी पोलीस (Ajni Police) करत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरीन दुर्गे यांनी दिली.

मनोरुग्ण त्याच्या पालकांकडे

कम्प्युटरच्या शिकवणी वर्गात जात असताना एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीच्या डोक्यावर मनोरुग्णाने हातोडा मारला. यात ती जखमी झाल्याची घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं आहे. दुर्दैवी घटना थोडक्यात बचावली असली तरी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं

मेडिकल चौकात विद्यार्थिनी शिकवणीला जात होती. पायऱ्या चढत असताना एक मनोरुग्ण तिथं आला. त्यानं तिच्या डोक्यावर हातोडा मारला. ती जोरानं ओरडली. आजूबाजूचे तिच्या मदतीला धावले. मनोरुग्णाला बाजूला केलं. पोलिसांनी मनोरुग्णाच्या पालकांना बोलावून त्याला त्यांच्या स्वाधीन केलं. या घटनेमुळं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे सुद्धा वाचा

वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.