cyber security : शाळा-कॅालेजमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती, सायबरतज्ज्ञ अजित पारसे यांचा उपक्रम
समोरच्या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती घेतात. यामुळे गुन्हेगारी करण्यास मदत होते. हळूहळू वैयक्तिक माहिती घेतात. लहान मुलांना जाळ्यात ओढले जाते, असं अजित पारसे यांनी सांगितलं.
नागपूर : नागपुरात वाढती सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) चिंतेती बाब आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या आता विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात अडकवतायत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी सायबर तज्ज्ञ अजित पारसे शाळा- कॅालेजमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी या सायबर जनजागृती मोहिमेची सुरुवात केलीय. श्री श्री फाऊंडेशन आणि सायबर तज्ज्ञ अजित पारसे (Ajit Parse) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. लहान मुलांनी आपली सायबर सुरक्षा कशी करावी, हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे, असं यावेळी अजित पारसे यांनी सांगितलंय.
ऑनलाईन गेमचं वाढलं प्रमाण
लहान मुलं ऑनलाईन गेम खेळतात. त्या माध्यमातून माहिती गोळा केली जाते. डमी युजर्स क्रियेट केले जातात. शाळांमध्ये शिबिरं लावणार आहोत. मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजावणार आहोत. ऑनलाईन मोबाईल खेळताना कोणती काळजी घेण्यात यावी, काय करावे आणि काय करू नये. मुलांना हक्कानी मोबाईल मागायला सुरुवात केली आहे. एक तास अभ्यास केला. आता अर्धा तास मोबाईल खेळू. यामुळं ऑनलाईन गेमचं प्रमाण वाढलंय.
अशी असते गुन्ह्याची पद्धत
एखादा युजर्स आठव्या वर्गात असेल.तर दुसरा मीही तुझ्याच वयाचा आहे. तुझे आई-वडील काय करतात. आर्थिक उत्पन्न काय आहे. तुमचे पालक परदेशात गेले होते का, कार कोणती आहे, अशी माहिती गोळा करण्यात येते. व्हॉट्सअपवर नंबर शेअर होतात. समोरच्या व्यक्तीकडून संपूर्ण माहिती घेतात. यामुळे गुन्हेगारी करण्यास मदत होते. हळूहळू वैयक्तिक माहिती घेतात. लहान मुलांना जाळ्यात ओढले जाते, असं अजित पारसे यांनी सांगितलं.