Nagpur Crime | नागपुरात गांजा तस्करी प्रकरणी अटक, पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष सुटका; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
11 जुलै 2017 रोजी सव्वा किलो गांजा तस्करी करताना निलेश आसरेला अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकानं सहा तास विलंबानं गुन्हा दाखल केला. पण, विलंबाचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळं पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात तर अडकवलं नाही, अशी शंका न्यायालयानं उपस्थित केली.
नागपूर : जिल्हा सत्र न्यायालयाने गांजा तस्करी प्रकरणातील (Cannabis Smuggler Case) आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. सव्वा किलो चरस तस्करी करताना रंगेहात पकडले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Drug Squad) सहा तास विलंबाने गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून विलंबाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. कारवाईदरम्यान सरकारी पंचही बोलवले नाही. ही परिस्थिती अनाकलनीय असल्याने पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे मत व्यक्त करून जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी तस्कराची निर्दोष सुटका (Innocent Released) केली. त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निलेश आसरे असे निर्दोष सुटका करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 11 जुलै 2017 ला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून हुडकेश्वर मार्गावर अटक केली होती.
काय आहे प्रकरण
11 जुलै 2017 रोजी सव्वा किलो गांजा तस्करी करताना निलेश आसरेला अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकानं सहा तास विलंबानं गुन्हा दाखल केला. पण, विलंबाचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळं पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात तर अडकवलं नाही, अशी शंका न्यायालयानं उपस्थित केली. सबळ पुरावे मिळाले नाही. त्यामुळं आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली.
सव्वा किलो चरस तस्करी
सव्वा किलो चरस तस्करी हा मोठा गुन्हा आहे. या प्रकरणी पोलिसांनी सबळ पुरावे दिले असते, तर आरोपीला शिक्षा झाली असती. पण, कधीकधी पोलीस पुरावे गोळा करण्यात कमी पडतात. तर कधीकधी त्यांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळं या प्रकरणी नेमकं काय झालं, हे त्यांनाच माहीत. पण, आरोपी निर्दोष सुटला. न्यायालयानं त्याला क्लीन चीट दिली. याचा अर्थ पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला नाही, असा होतो.