Wardha Crime | आर्वीतील गर्भपात प्रकरण, कदमकडं सापडला कुबेराचा खजाना!; नऊ तासांत पोलिसांनी नेमकं काय शोधलं?

आर्वीतील गर्भपात प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. डॉ. कदमकंडं पोलिसांनी नऊ तास शोधमोहीम राबविली. यात फार मोठा खजिना सापडला आहे. या खजिन्याचे उत्पन्न नेमकं कुठून आलं, याचा शोध आता आयकर विभाग घेणार आहे.

Wardha Crime | आर्वीतील गर्भपात प्रकरण, कदमकडं सापडला कुबेराचा खजाना!; नऊ तासांत पोलिसांनी नेमकं काय शोधलं?
अशी संपत्ती लपवून ठेवली होती.
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 2:43 PM

वर्धा : आर्वी येथील गर्भपात प्रकरणात (Abortion case at Arvi) शनिवारी पोलिसांनी कदम (police action) यांच्या घरातील सील केलेल्या खोलीला उघडत तपासणी केली. याचदरम्यान पोलिसांना एका कपाटात जुन्या लोखंडी पेटीत बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली. दुपारी पोलिसांना ही रक्कम मिळाली. शनिवारी रात्रीपर्यंत याचा मोजमाप सुरू होते. ही रक्कम तब्बल 97 लाख 42 हजार 772 रुपये असल्याचं समोर आलंय. पोलिसांना ही रक्कम मोजण्यासाठी तब्बल 9 तास लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली. पोलिसांनी आयकर विभागाला (income tax department) पत्र देत सूचना दिल्या आहे.

पोलिसांनी केली होती खोली सील

आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले. या प्रकरणात पोलिसांनी तपास करत एकूण सहा लोकांना अटक केली आहे. याच प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी कदम याचे रुग्णालयाच्या वर असलेल्या घरात पहिले तपासणी केली होती. मात्र त्यावेळेस डॉक्टर नीरज कदम यांच्या आई डॉ. शैलजा कदम यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने शैलजा कदम यांना नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शैलजा यांच्यासोबत नीरज कदम यांचे वडील कुमारसिंग कदम हे सुद्धा रुग्णालयात असल्याने एका खोलीला लॉक आहे. त्याच्या चाव्या या कुमारसिंगकडे असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे पोलिसांनी ती खोली सील केली होती.

पोलिसांना नेमकं काय सापडलं?

शनिवारी कदम कुटुंबीयाकडून त्या खोलीची चावी पोलिसांना सुपूर्द केली. पोलिसांनी खोली उघडून त्यात काही कागदपत्रं किंवा महत्वाचे पुरावे मिळतात काय, याची तपासणी केली. खोलीत पाच ते सहा कपाटं दिसून आली. पोलिस कपाटं उघडून तपासणी करत असताना त्यात पोलिसांना एक लोखंडी पेटी आढळली. त्यात जवळपास तीन बॅगमध्ये पोलिसांना रक्कम आढळली. रात्री उशिरापर्यंत मशीनच्या मदतीने पोलिसांनी रक्कम मोजली. यात 97 लाख 42 हजार 772 रुपये आढळल्याचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुडकर यांनी सांगितलं. ही रक्कम आली कुठून, कुणाची आहे, याचा शोध पोलिसांसह आयकर विभाग घेणार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आयकर विभागाला माहिती सुद्धा दिली आहे, असेही भानुदास पिदुडकर यांनी सांगितलं.

MPSC | नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला!, अभाविपचा दावा; आयोग म्हणते असं काही घडलंच नाही, नेमकं काय?

Chandrapur Thermal Power | चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई; राष्ट्रीय हरित लवादाने घेतली तक्रारीची दखल, प्रकरण काय?

Nagpur Zero | एका शून्याचं महत्त्व! एक शून्य अतिरिक्त पडला नि कोट्यवधी रुपये खात्यात जमा; नेमकं प्रकरण काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.