AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी आशिष देशमुख यांची मोठी घोषणा, राजकारणात नवा पायंडा पडणार?; काय म्हणाले देशमुख?

राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी असं मी म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी यापूर्वी माफी मागीतली होती. गांधी कुटुंब ओबीसी द्रोही आहे. गांधी कुटुंबाने ओबीसींच्या दोन पिढ्या बरबाद केल्या. 

वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी आशिष देशमुख यांची मोठी घोषणा, राजकारणात नवा पायंडा पडणार?; काय म्हणाले देशमुख?
ashish deshmukhImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 3:07 PM

नागपूर : काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आहे. आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस म्हातारी झालीय. जीर्ण झाली आहे, असं आशिष देशमुख म्हणाले. यावेळी त्यांनी वयाच्या 49 व्या वर्षीच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकारणात नवा पायंडा पडणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.

आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काँग्रेस म्हातारी जाली आहे. जीर्ण झाली आहे. त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला नाही. काँग्रेसने मला पक्षातून काढलं हे चांगलं झालं. त्यामुळे मी भाजपमध्ये येऊ शकलो. आता मी जाहीर करतो की, 2024ची विधानसभा निवडणूक मी लढणार नाही. भाजपच्या हितासाठीच काम करेल, अशी घोषणा आशिष देशमुख यांनी करताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या घोषणेचं स्वागत केलं.

हे सुद्धा वाचा

तहहयात भाजपमध्ये राहील

भाजपमध्ये आल्यानंतर मी या निमित्ताने काटोलमधील काकागिरी, सावनेरमधील दादागिरी आणि विदर्भातील नानागिरी संपवणार आहे. काटोलमधून भाजपचा उमेदवार मी निवडून आणणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. नाना पटोले आणि नितीन राऊत यांना आम्ही आमदार केलं. आमदारकी ही मोठी गोष्ट नाही. पण विदर्भाच्या हितासाठी मी भाजपमध्ये आलो आहे. आता अविरत आणि तहहयात भाजपातंच राहायचं वचन मी तुम्हाला देतो. मी 20 ते 25 आमदार वाढवण्यासाठी मदत करणार आहे. मला पक्षात थोडी व्यापक भूमिका द्या, असंही त्यांनी सांगितलं.

दिलगिरी व्यक्त केली

सुबह का भूला शाम को घर आये तो उसे भूला नही कहते असं म्हणत आशिष देशमुख यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. तसेच पक्षात प्रवेश दिल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. राज्यात फडणवीस यांचं नेतृत्व हे सक्षम आहे, असं त्यांनी सांगितलं.

सर्वविरोधी नेते फडणवीस यांच्यासोबत

यापूर्वीचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आज फडणवीस यांच्यासोबत आहेत. त्यापूर्वीचे विरोधीपक्ष नेते एकनाथ शिंदेही आज फडणवीस यांच्या सोबत आहे. मी गेली विधोनसभा फडणवीस यांच्या विरोधात लढलो तरी आज त्यांच्या सोबत आहे. भाजपात प्रवेश करतोय. जे झालं ते नव्हतं व्हायला पाहिजे. विदर्भाच्या दृष्टीने फडणवीस मुख्यमंत्री होणं गरजेचं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी खंजीर नाही तलवार खुपसली. उद्धव ठाकरे विदर्भद्रोही आहेत. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

नानाच्या बोलण्यात अर्विभाव

मी शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेऊन आलो आणि माझी भाजपातील वाटचाल श्रद्धा आणि सबुरीनं होऊ दे असं म्हटलं. बावनकुळे यांच्यामुळे माझा पक्षात प्रवेश झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मला अनुभव आहे. आपण त्यांच्याकडे पाहिलं तर ते दुसरीकडेच बघतात. नाना पटोले यांचा फोन लागत नाही. ते फोन करत नाही. नाना यांच्यात वागण्याबोलण्यात अविर्भाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.