Nagpur Crime | आमदार भांगडिया यांच्या नातेवाईकावर हल्ला; का केली असेल अज्ञान आरोपींनी मारहाण?

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला असल्याची माहिती धंतोलीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.

Nagpur Crime | आमदार भांगडिया यांच्या नातेवाईकावर हल्ला; का केली असेल अज्ञान आरोपींनी मारहाण?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 9:26 AM

नागपूर : नागपुरात भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या गाडीवर अज्ञात आरोपीने आधी दगडफेक केली. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. नंतर जाब विचारताच अंकित भुतडा आणि फिरदोस खान यांना मारहाण केली. यात फिरदोस हे जखमी झाले. धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला.

गाडीतून ओढत मारहाण

भाजप आमदार बंटी भांगडीया यांचे चुलतभाऊ अंकित भुतडा आणि त्यांचे पार्टनर फिरदोस खान हे एका कारमधून जात होते. महाराष्ट्र बँक चौक परिसरात पाच अज्ञात आरोपींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्याचा जाब त्या आरोपींना फिरदोस यांनी विचारला. त्यांनी त्यांना गाडीतून ओढत जबर मारहाण केली. अंकीत गाडी चालवत होता. त्याने गाडी बाजूला लावून तो धावला असता त्याला सुद्धा मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला असल्याची माहिती धंतोलीचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.

भाग जावं म्हटलं आणि पळाले…

तू कोण हैं, तू समजता क्या हैं, आमदार का भाई है क्या असं म्हणत शिवीगाळ केली. मात्र एका ऑटो चालकाने भाग जावं म्हटलं म्हणून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक जमतील हे बघून आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला. सगळे आरोपी बाईकवरून पळाले.

कट रचून हल्ला

मारहारण करते वेळी ‘तुम क्या आमदार के भाई हो क्या’ असा सारखा उल्लेख आरोपी करत होते. यामुळे आरोपींकडून कट रचून हा हल्ला केल्याचे दिसून येते. आरोपींना आपण ओळखत नाही. त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी माहिती फिरदोस यांनी दिली. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये पाचही आरोपी दोन दुचाकीवरून जाताना दिसून आले आहे. पोलीस त्यांची ओळख पटवत आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. सोबत जात असताना मी कार चालवत होतो. फिरदोस हे बाजला बसले होते. मुळात फिरदोस हाच आमदाराचा भाऊ असावा, असा हल्लेखोरांचा समज झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर जबर हल्ला केला. यावेळी आरोपींनी मलाही मारहाण केली, अशी माहिती अंकित भुतडा यांनी दिली.

Video-Bhandara | आमदार कारेमोरेंचा ठाण्यात गोंधळ! व्यापाऱ्याचे 50 लाख पळविले; पोलीस म्हणतात, शासकीय कामात अडथळा, नेमकं काय चाललंय भंडाऱ्यात?

Nagpur Corona | कोरोनाचा आणखी एक बळी, 54 पॉझिटिव्ह, बालकांचे लसीकरण लवकरच

Ration grain | रेशनच धान्य गरिबांना कमी, बाजारात जास्त; नागपुरात नेमकं चाललंय काय?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.